Saturday, May 16, 2026
Home Buldana वाहकाची वाढली हिंमत; बसमध्ये केला प्रवाशी महिलेचा विनयभंग!

वाहकाची वाढली हिंमत; बसमध्ये केला प्रवाशी महिलेचा विनयभंग!

3

म्हणे तुया व्हिडीओ काढला; वैजापूर आगाराच्या वाहकाचा प्रताप

मोताळा- प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ब्रीद वाक्याला वाहकाने ठेंगा दाखविला असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या 31 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना प्रवासादरम्यान 9 मे रोजी मोताळा बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी शुक्रवार 15 मे रोजी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी रा.प.वैजापूर आगार जि.छत्रपती संभाजीनगर येथील ‘त्या’ वाहकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

झाले असे की, मलकापूर येथील एक महिला 9 मे रोजी मलकापूर येथून वैजापूर दरम्यान प्रवासास निघाल्या होत्या. दरम्यान दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास मोताळा बसस्टॉप येथे रा.प. वैजापुर आगार, जि. छत्रपती संभाजीनगर येथील साधी लाल रंगाची बसच्या वाहक याने फिर्यादीसोबत अंगलट करीत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. तेंव्हा फिर्यादीने त्याला धक्का मारु नका, व्यवस्थीत बसा, असे म्हणाले असतांना ‘त्या’ चवताळलेल्या वाहकाने पिडीत महिलेच्या साडीच्या पदराखालून हात घालीत विनयभंग केला. यावेळी फिर्यादी तेथून उठण्यास लागले म्हणून तेव्हा त्याने धक्काबुक्की लागतच असते, बदनामी होवू नये म्हणून फिर्यादी काहीही बोलले नाही. तो फिर्यादीच्या मोबाईलवर वारंवार कॉल करीत तुझा व्हीडीओ काढलेला आहे, अशी धमकी संभाजीनगर येथे बोलवत होता, अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी रा.प. वैजापुर आगार, जि. छत्रपती संभाजीनगर वाहकावर भारतीय न्याय संहिता कलम 74,351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेका. अमोल खराडे हे करीत आहे.

Don`t copy text!