तालखेड गावावर शोककळा; रंगपचमीला पाटात बुडाल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू !

730

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (8 Mar.2023) तालुक्यातील तालखेड येथे रंगपचमी खेळून सायंकाळी गावालगतच्या पाटाच्या पाण्यात पोहण्यसाठी गेलेल्या एका 9 वर्षीय चिमुकल्या मुलाचा पाण्यात बुडाल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना 7 मार्च रोजी घडली. मृतक मुलाचे नाव कुणाल वैतकार असे आहे. तो आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होता.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोताळा तालुक्यातील तालखेड येथील कुणाल रामदास वैतकार (वय ९ ) हा इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा 7 मार्च रोजी दिवसभर रंगपंचमी खेळून दुपारच्या दरम्यान मोठ्या बाबाचा मुलगा व कुणाल हे दोघेही गावालगतच्या पाटात पोहण्यासाठी गेले होते..पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे परंतु अवकाळी पाऊसामुळे पाटात पाणी वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात 15 मिनिट राहिल्याने बुडाला होता. कुणाल पाण्यात अडकल्याने त्याच्या मोठ्याबाबाच्या मुलाने आजुबाजुच्या लोकांना आराडाओरड करुन बोलवून आणले, परंतु तोपर्यत खुप उशीर झाला होता. कुणालला गावकऱ्यांनी उपचारार्थ मोताळा येथून बुलढाणा येथे उपचारार्थ हलवित असतांना त्याचा बुलढाणा घाटात मृत्यू झाल्याची माहिती आहे. कुणाल हा आई-वडिलांना एकलुता एक मुलगा असल्यामुळे वैतकार कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरल्याने 7 मार्चच्या संध्याकाळी गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही.