बुलढाण्यात श्याम ढाब्याजवळ 32 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला !

1005

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (8 Mar.2023) खरचं माणसाच्या जीवनाचे काही सांगता येत नाही, कोणाचा काळ केंव्हा येईल व मृत्यूला केंव्हा सामोरे जावेल लागेल याचा नेम नाही. अशीच एक घटना आज 8 मार्च रोजी चिखली रोडवरील श्याम धाब्याच्या समोर उघडकीस आली असून त्या ठिकाणी एका 32 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती बुलढाणा शहर पोस्टे.ला मिळताच पोलिसांनी दुपारी 3.30 वाजता घटनास्थळावर जावून पंचनामा करुन प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सदर मृतक इसम हा अंदाजे 30 ते 32 वर्ष वयोगटातील असून रंग गव्हाळ, डोक्यावर बारीक केस असून हनुवटीजवळ छोटीशी दाढी वाढलेली आहे. त्याने निळसर भुरकट रंगाचा शर्ट व नाईट पॅन्ट घातलेला आहे. उंची अंदाजे 5.6 इंच असून सदर इसमाचा मृतदेह आज 8 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आढळून आल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोस्टे. पीएसआय.पवार साहेब, पोकॉ.भगावान शेवाळे, पोकॉ.ज्ञानेश्वर जाधव व होमगार्ड यांनी घटनास्थळावर पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला आहे. सदर इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोस्टे.च्या वतीने करण्यात आली आहे. मृतदेह ओळख पटविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय,बुलढाणा येथे ठेवण्यात आला आहे. उपरोक्त वर्णनाचा इसम आपल्या परिसरातील किंवा ओळखीचा असल्यास बुलढाणा शहर पोस्टे.पोलिस निरिक्षक प्रल्हाद काटकर मो.8459430703 क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.