चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमांना भरचौकात फाशी द्या-रिपब्लीकन सेना

129

चिखली (BNU न्यूज)- महाराष्ट्रामध्ये महिला व मुलींवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी शासनस्तरावर शेकडो कायद्ये करण्यात आले आहे. परंतु त्या कायद्याचे अस्तीत्व कागदावरच असल्याने आजही राज्यामध्ये महिला व मुलीवर होणारे अत्याचार थांबवता थांबत नाही. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात घडली. एका समाजाच्या 11 वर्षीय चिमुरडीवर दोन नराधमांनी सेलू येथून अपहरण करुन त्या 5 सप्टेंबर चिमुरडीवर अत्याचार केला, त्या दोन आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी 9 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हा रिपब्लीकन सेनेच्यावतीने चिखली तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील 11 वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलगी व तिचा भाऊ यांचे सेलू येथून अपहरण करून बोरी तालुका जिंतूर येथे दोन नरधामांनी आणून तिच्या भावाला कौसडी फाटा येथे सोडून चिमुरडीवर कोक शिवारात लैंगिक अत्याचार करुन पसार झाले. त्त्या आरोपींवर बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करावा व महाराष्ट्र सरकारने महिलांवर व बाल मुलींवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे. अश्या घटनांची राज्यात पुर्नरावृत्ती होवू नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने ताबडतोब निर्णय घेवून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालून त्यांना फाशी देण्यात येवून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना शासनाकडून त्वरित मदत देण्यात यावी. अश्या घटना वाढल्या तर महाराष्ट्रभर सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये आंदोलन छेडण्याचा इशारा, रिपब्लिकन सेनेच्यावतीने बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांच्यावतीने मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतांना जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, युवा जिल्हाध्यक्ष लखन कुसळकर, तालुका अध्यक्ष श्याम लहाने, सतीश इंगळे, ऋषिकेश हिवाळे, सतीश पवार, सौरभ बावस्कर, देवानंद श्रीसागर, श्याम बशिरे, अविनाश खरे, देविदास खरे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.