नोंदणीकृत अंशकालीन उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

941

बुलढाणा(BNU न्यूज)- जिल्ह्यातील नोंदणीकृत अंशकालीन कर्मचाऱ्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार आहे. यासाठी अंशकालीन उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा डाटाबेसचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित अंशकालीन कर्मचाऱ्यांनी mahasawyam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले युझर आयडीने लॉगीन करून नोंदणीचे नुतनीकरण करून अद्यावत माहिती भरावी. नोकरी मिळाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे नोंदणीची आवश्यकता नाही, अशा उमेदवारांची माहिती व सेवायोजन कार्ड जमा करावे, तसेच शासकीय कंत्राटी नोकरीसाठी पात्रताधारक पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अभिलेख अद्यावत करणे शक्य होईल, असे जिल्हा कौशल्य व विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रा.यो.बारस्कर यांनी कळविले आहे.