Wednesday, May 6, 2026
Home Buldana स्थागुशाने सातगाव भुसारी येथे 67 हजाराचा गुटखा पकडला !

स्थागुशाने सातगाव भुसारी येथे 67 हजाराचा गुटखा पकडला !

471

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (6.JUNE.2023) बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेने सातगाव भुसारी परिसरात शासनाने प्रतिबंधीत केलेला 66 हजार 820 रुपयांचा गुटखा तसेच 1 लाख रुपये किमतीची अलटो कार असा एकूण 1 लक्ष 66 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई 5 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

स्थानिक गुन्हा शाखेला सातगाव भुसारी परिसरात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन 5 जून रोजी रात्री 8 वाजता नाकाबंदी करुन आरोपी कासम मदन गुंगीवाले व अभिजीत सुरेश शिंदे दोन्ही रा.चिखली यांच्याकडून राज निवास, आरएमडी पान मसाला असा एकूण 66820 रुपयांचा गुटखा तसेच वाहतूक करणारी अल्टो कंपनीची 1 लाख रुपयांची कार असा एकूण 1 लक्ष 66 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थागुशाने जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी व अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ.दिपक लेकुरवाळे, शरद गिरी, एनपीसी.गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, पोकाँ.गजानन गोरले, शिवानंद मुंढे यांनी केली. पोना. पुरुषोत्तम आघाव यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोस्टे.ला कासम मदन गुंगीवाले व अभिजीत सुरेश शिंदे यांच्यावर भादंवीचे कलम 328, 188, 273 व अन्नसुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26 (2),(IV)शिक्षा पात्र कलम 59(1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Don`t copy text!