श्रीमंतांना जगणे कठीण झाले
गरिबांचे मरण सोपे झाले..
ते झोपेसाठी गोळ्या घेतात,
गरीब झोपडीतच शांत झोपी जातात !
वितभर पोटासाठी, राज्यभर फिरुन
ते कुटुंबीयांना पोसतात..
निर्दयी काळ अन् वेळही
त्यांच्यावरच टपलेला असतो !
फुटपाथवर सलमानची गाडी उडविते
कधी रोडवर चिरडले जातो..
गुन्हा काय आमचा ? गरीब आम्ही ?
घटना म्हणून पेपरात बातम्या येतील !
दोन दिवसांनी सर्वच विसरुन जातील
शेवटी कुटुंबीयांचे काय ? हा प्रश्न तर
कदाचीत हे निष्प्राण पडलेले देह
विचारत तर नसतील ना ?
-सविता शिराळ, मोताळा
buldananewsupdate@gmail.com