तो फुस्स..फुस्स करीत होता; ‘त्या’ कोब्राला सर्पमित्र रसाळ यांनी जीवनदान दिले !

58

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (2.Oct.2023) सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. काही बिनविषारी तर काही विषारी साप आहेत. त्यात सर्वाधिक विषारी साप म्हणून कोब्राची ओळख आहे, त्याला पाहिले की भल्या-भल्याची घाबरुन जाते. फुस्स…फुस्स, असा आवाज पाईपातून अंभोडा येथील शेतकरी नारायण पवार यांना आला असता त्यांनी पाईपाला रुमाल बांधून सर्पमित्र एस.बी.रसाळ यांना बोलावून सदर सापाला प्लास्टीक बरणीमध्ये बंदीस्त करुन जंगलात सोडून त्याला जीवनदान दिले.

बुलढाणा तालुक्यातील अंभोडा येथील शेतकरी नारायण बाजीराव पवार पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना आज 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पाईपामधून फुस्स…फुस्स…असा आवाज आला. त्यांनी पाईपाजवळ जावून पाहिले असता त्यांना मोठा साप दिसला. पवार यांनी न घाबरता समय सूचकता दर्शवित पाईपाचे दोन्ही तोंड रुमालाने बांधून ठेवून त्यांनी वन्यजीव संरक्षण व निर्सग पर्यावरण संस्था, बुलढाणा अध्यक्ष एस.सी.रसाळ यांना फोन लावून बोलाविले असता त्यांनी अंभोडा येथे धाव घेत पाईपजवळील आवाजावरुन कोब्रा जातीचा साप असल्याचे समजल्याने त्यांनी पाईपातून 4 फुट लांब कोब्राला पकडून प्लास्टीक बरणीमध्ये बंद करुन ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून जीवदान दिल्याने गावकऱ्यांनी सर्पमित्र रसाळ यांचे आभार मानले. यावेळी गावकऱ्यांनी साप पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी-रसाळ

शेतकऱ्यांनी शेतातील पाणी देण्याचे व इतर कोणतेही कामे करतांना तसेच पाईप उचलतांना सावधनता बाळगावी. मोटारचे बटण चालू करतांना लाकडी काडीचा उपयोग करण्याचे आवाहन , सर्पमित्र रसाळ यांनी केले आहे.