Tuesday, May 26, 2026
Home Buldana वंचितची मागणी लई भारी; जिल्हाध्यक्ष निलेश जाधव म्हणतात, मुख्यमंत्र्यांवर पहिला फौजदारी गुन्हा...

वंचितची मागणी लई भारी; जिल्हाध्यक्ष निलेश जाधव म्हणतात, मुख्यमंत्र्यांवर पहिला फौजदारी गुन्हा दाखल करा !

25

बुलढाणा-जिल्ह्यासह महाराष्ट्रभर गॅस टंचाई, पेट्रोलपंप बंद, डिझेल, पेट्रोल नाही अशी परिस्थीत असल्याचे इलेक्ट्रॉनीक मीडियासह वृत्तपत्रांमध्ये वाचायला व बघायला मिळत आहे. देशाचे पंतप्रधन संसदेत ऑन रेकॉर्ड देशात कोराना काळात जसे लॉकडाऊन लागले होते, तशी परिस्थीती निर्माण होवू शकते. याला शासनच जबाबदार आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी व्यक्त करीत शासनच सामान्य जनतेला फसवित असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

काय म्हटले निलेश जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकातमध्ये, गॅस टंचाई, पेट्रोलपंप बंद पेट्रोल आहे, तर डिझल नाही अशी परिस्थिती जिल्ह्यासह महाराष्ट्रातभर इलेक्ट्रिनिक मीडिया सह वृत्तपत्रांनमध्ये वाचायला व बघायला मिळत असतांना देशाचे पंतप्रधान संसदेत ऑन रेकॉर्ड म्हनतात की, आपल्या देशामध्ये कोराना काळात जसे लॅाकडाऊन लागले होते, तशी परिस्थिती आता निर्माण होऊ शकते. कोरोना काळाचे स्मरण केलेतर तर कळेल की, सर्वसामान्य जनतेला आपला जीव गमवावा लागला. जर खुद्द पंतप्रधानच असे वक्तव्य करत असतील तर गॅस,डिझेल व पेट्रोल साठी सर्वसामान्य जनतेचा उद्रेक होऊन सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीसाठी शासनच जबाबदार असल्याचे निलेश जाधव यांनी पत्रकात म्हटले असून शासनाने व्यवसायिक गॅस बंद केलेत तरी सुद्धा सामान्य जनतेला गॅससाठी अडचण व हॅाटेल चालकांना गॅस हा दुजाभाव शासनच करत आहे.

गॅसच्या रांगेत उभे असतांना वृध्दाचा मृत्यू

अकोल्यामध्ये एक वयोवृद्ध गॅस मिळेल या आशेने ६ तास रांगेत उभे राहिले असता त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे, ही सत्य परिस्थिती असतांना मुख्यमंत्री महोदय म्हणतात की, अफवा पसरविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा.. तर मग सामान्य जनतेला शासनच फसवत खोटं बोलून अफवा पसरवत असल्यामुळे पहिला गुन्हा हा मुख्यमंत्री महोदयावंर व दुसरा गुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दाखल करण्याचे आवाहन वंचित जिल्हाध्यक्ष निलेश जाधव जिल्हा प्रशासनास केले आहे.

Don`t copy text!