Wednesday, April 29, 2026
Home Buldana चोरटे अ‍ॅक्शन मोडवर; भोरटेक येथे 65 हजाराच्या दागिण्यावर मारला डल्ला !

चोरटे अ‍ॅक्शन मोडवर; भोरटेक येथे 65 हजाराच्या दागिण्यावर मारला डल्ला !

3

मोताळा- चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत तालुक्यातील भोरटेक येथे एका महिलेच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिण्यासह रोख रकमेवर डल्ला मारीत 65 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना मंगळवार 28 एप्रिलच्या सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे भोरटेक परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून या चोरट्यांना पकडण्याचे त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे.

झाले असे की, तालुक्यातील भोरटेक येथील सौ.कांता उल्हास थोरगण यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली, अज्ञात चोरट्यांनी 27 एप्रिलच्या रात्रीच्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाटात प्लॅस्टीकच्या सुटकेस मध्ये ठेवलेल्या सोन्याची दोन गहू पोथ 200 मण्याची एक पदकसह वजन दीड तोळे, एक कारल्या मण्याची सोन्याची पोथ वजन 4 ग्रॅम, सोन्याचे मंगळसूत्र मण्यासहित वजन 6 ग्रॅम, कानातले सोन्याचे 4 ग्रॅम, चांदीचे जोडवे वजन दोन तोळे, चांदीच्या तोरड्या 3 तोळे व नगदी 10 हजार तसेच बँकेचे कागदपत्र व दागीण्यावर डल्ला मारीत 65 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द बीएनएस 2023 कलम 305, 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना पकडण्याची मागणी होत आहे. बोराखेडी ठाणेदार सितामरा मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकाँ. दिलीप तडवी हे करीत आहे.

Don`t copy text!