मोताळा- वाद कशावरुन व कोणत्या कारणामुळे होईल, हे सांगता येत नाही. मोताळा तालुक्यातील शेलापूर बु. येथे आऊटलेटच्या पाईपाच्या क्षुल्लक कारणावरुन वाद होवून तिघांनी एकास शिविगाळ करीत विळा मारुन जखमी केले. सदर घटना 24 मे रोजी घडली.
झालं असं की, प्रल्हाद शामराव मानकर रा.शेलापूर बु. यांना 24 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास गावातील रामभाऊ काशीराम खराटे यांनी काढलेल्या आउटलेटचे पाईपाच्या क्षुल्लक कारणावरुन शिविगाळ करीत उजव्या डोळयावर विळा मारुन जखमी केले आहे. फिर्यादीची आई व मुलगी हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांना सुध्दा रामभाऊ खराटे याने डाव्या हाताचे मनगटावर विळा मारून जखमी केले. मुलगी हीला कैलास रामभाऊ खराटे याने उजव्या हातावर दगड मारून जमखी केले. तसेच तिघांनी फिर्यादी व त्यांची आई तसेच मुलीला शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी रामभाऊ काशीराम खराटे, कैलास रामभाऊ खराटे, शंकुतला रामभाऊ खराटे सर्व रा.शेलापूर बु. यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.



























