मोताळा- जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातून 25 दिवसात एकूण 80 मुली बेपत्ता झाल्याची भयावह माहिती समोर आली आहे. त्याला मोताळा तालुका सुध्दा अपवाद नाही. तालखेड येथील 23 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. बोराखेडी पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.
झालं असं की, तालखेड येथील संजय कडु गव्हाळे यांची मुलगी शारदा संजय गव्हाळे (वय 23) ही 24 मे रोजी सकाळी 7 फिर्यादी व त्यांची पत्नी शेतात गेले त्यावेळी ती घरी होती. मात्र ते शेतातून काम आटोपून ते 11.30 वा घरी परत आले असता, शारदा घरी दिसली नसल्याने त्यांनी शेजारी विचारपूस केली. पत्नीला सुध्दा मुलगीबद्दल काहीच माहिती नव्हते. नातेवाईकांकडे विचारपूस केली, सर्वत्र शोध घेतला Sharda आढळून आली नाही. घरी काही न सांगता घरातून निघून गेल्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे. मुलीचा रंग सावळा, अंगात् पिवळा टॉप व काळया रंगाची लेगीन घातलेली असून हातावर इंग्रजीमध्ये ‘S’ गोंदलेले असून पायात काळया रंगाची चप्पल घातलेली आहे.



























