बुलढाणा – NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, जिल्ह्याच्या वतीने आज शुक्रवार 29 मे रोजी श्रद्धेय ADV. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियमसमोर धरणे आंदोलन वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव,देवा हिवराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी संबोधित करतांना मोहित दामोदर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान स्वतःला “विश्वगुरू” म्हणून संबोधतात; मात्र NEET पेपरफुटीचा प्रकार हा केंद्र सरकार आणि देशातील शिक्षण व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान(DHARMENDRA PRADHAN) यांनी या प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच NTA ची सखोल चौकशी करून NEET परीक्षा घेण्याचे अधिकार UPSC कडे देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करीत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
आंदोलनस्थळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विशाखाताई सांवग, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंगोले, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा महासचिव प्रथमेश डोंगरे, बुलढाणा शहराध्यक्ष अब्दुल नावेद, मोताळा तालुकाध्यक्ष रितेश तायडे, नांदुरा तालुकाध्यक्ष अमोल तायडे, मनोज खरात, समाधान डोंगरे, संजय धुरंदर, आबाराव वाघ, सुमित ब्राह्मणे, भूषण वानखडे, आकाश सरदार, शुभम उमाळे, अजय गवई, शुभम नरवाडे, आकाश जाधव, सलमानभाई, मिलिंद वानखेडे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























