मोताळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँगेस एकवटली!

455

शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत तहसिलदारांशी चर्चा करुन दिले निवेदन

मोताळा(BNU न्यूज) सततच्या पावसामुळे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करुन मोताळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ बळीराजाला आर्थिक मदत देण्याच्या मागणी संदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांनी तहसिलदार डॉ.सारिका भगत यांच्याशी चर्चा करुन त्यांना शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सततच्या पावसामुळे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, पाणी साचल्याने जमिनी चिबळल्याने शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन, मका, मुग, उडीद, तीळ यासह आदी पिकांच्या मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे शेतकरी मागील दोन वर्षापासून मोठ्या अडचणीत साडपला होता, तर यावर्षी अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतीला लावलेला खर्च सुध्दा निघाला नसल्याने मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर बळीराज्याच्या डोक्यावर वाढण्याची शक्तता निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करुन मोताळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी, अतिपावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझाड झाली असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच जिल्ह्यात लंपी आजाराने डोके वर काढल्याने अनेक जनावरांना त्याची लागण झाली आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात वाढू नये, यासाठी मोताळा तालुक्यात लंपी आजारावरील लसी उपलब्ध करुन देण्यात यावी. निराधारांना संजय गांधी निराधार योजनेतंर्गत आर्थिक मदत देण्यात येते, परंतु या संदर्भात मागील काही महिन्यापासून या योजनेची बैठक झाली नाही. सदर बैठकीचे आयोजन करुन निराधारांच्या खात्यात सानुग्रह मदत देण्याची मागणी मोताळा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गजानन मामलकर यांच्यातवीने मोताळा तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

निेवदेन देतेवळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेशराव पाटील, विधान सभा समन्वये अ‍ॅड.गणेशसिंग राजपूत यांच्यासह संजय किनगे पाटील, तुळशीराम नाईक, अतिश इंगळे, शाम कानडजे, रवि पाटील, अविनाश मोदे, महिंद्रा गवई, राजेंद्र वाघ, वसीम अमीर खान, नितीन खराटे, प्रमोद देशमुख, निंबाजी गायकवाड, इरफान पठाण, शाम देशमुख, ज्ञानेश्वर गोराळे, बळीराम नरवाडे यांच्यासह जिल्हा काँग्रेस, तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.