खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांची चिखली येथे धडाकेबाज कारवाई; 8 लक्ष 85 हजाराचा जुगार पकडला ! चिखलीशहर बनले जिल्हा अड्डा.. वरली माफीयांनी आकडे घेण्यासाठी सुरु केली होती वेबसाईड

404

बुलढाणा (BNU न्यूज) अवैध धंदे करणारे माफीया या इंटरनेटच्या जमान्यात वेगवेगळा फंडा वापरुन लाखो करोडो रुपये कमावित आहे, याकडे स्थानिक पोलिस विभागाचे दुर्लक्ष होते की ते आर्थिक देवाण-घेवाणीतून दुर्लक्ष करतात, हा सुध्दा एक मोठा प्रश्न आहे. चिखली शहरात तर वरली-मटका चालविण्यासाठी माफीयांनी चक्क वेबसाईटच खोलून वरलीचा धंदा थाटला होता. या धंद्याची श्रवण दत्त एस.अप्पर पोलिस अधिक्षक खामगाव, पदभार बुलडाणा यांना चुणूक लागताच त्यांनी कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 8 लक्ष 85 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करीत धडाकेबाज कारवाई केल्याने वरली-मटका चालविणाऱ्यांचे धाबे दणालेले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अवैद्य धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत आला. याबाबत काही ठिकाणी काँग्रेसने अवैद धंदे बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा दिला, परंतु तेथील पोलिस प्रशासनाने काँग्रेसच्या ‘त्या’ तालुकाध्यक्षांच्या नाकावर टिच्चून अवैद धंदे सुरु ठेवून आम्ही वरपर्यंत हप्ते देतो म्हणून अवैद धंदांना परवानगी देतो, असे सुतोवात करुन त्या तालुक्यातील अवैद धंदे सुरुच आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वरली मटक्याला मोठ्या प्रमाणात उत आला आहे. काही अधिकारी आर्थिक देवाणघेवाणीमुळे अवैद धंद्यांकडे दुर्लक्ष करतात काही कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांचा कर्दनकाळ ठरतात, अशीच कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त खामगाव पदभार बुलडाणा यांनी 22 सप्टेबर रोजी चिखली येथे केली आहे.

चिखली पोस्टे हद्दीत धिरजलाल रुपारेलीया व त्यांचा मेहूल धिरजलाल रुपारेलीया या पितापुत्र गोल्डन डे व गोल्डन नाईट जुगार माफीया असून त्यांनी चक्क dpboss.net ही वेबसाईट भाड्याने घेतली असून त्यावर ते वरलीचे आकडे प्रर्दशीत करतात. ते मोबाईलच्या माध्यमातून व्हॉटसॲपद्वारे जिल्हाभरातून आकडे घेण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कामगार ठेवलेले असून त्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात वरलीचे आकडे घेताता. तसेच चिठ्याद्वारे सुध्दा आकडे जमा करतात त्यासाठी त्या पितापुत्रांनी मोठे ऑफीस सुध्दा खोलून चिठ्ठया प्रिंट करण्यासाठी प्रिटरची सुध्दा व्यवस्था केली होती. रुपारेलीया यांनी खडकपूरा भागात असलेल्या ठिकाणी सुध्दा मोठे प्रशस्त ऑफीस खोलले होते. तसेच त्याच परिसरात भगवान दांडगे यांच्या घराच्यावर दोन रुप भाड्याने घेवून त्यामध्ये सुध्दा ते जुगाराचा अड्डा चालवित होते. या ठिकाणी काही एजेंटसच्या मार्फत वरली तसेच हारजितवर एक्का बादशहा खेळल्या जात होता, अश्या गुप्त माहितीवरुन खामगाव अप्पर पेालिस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव पोलिसांनी 22 सप्टेबर रोजी दुपारी 1.35 वाजता धाड टाकली असता तेथील दोन रुममध्ये 15 इसम वरलीचे आकडे घेतांना आढळून आले त्या सर्व आरोंपीकडून 43 मोबाईल किंमत 2 लक्ष 94 हजार, 4 प्रिंटर किंमत 56 हजार रुपये , 12 मोटार सायकल किंमत 5 लक्ष 10 हजार रुपये, 29 आरोपींकडून 8 हजार रुपये नगदी व इतर साहित्य 17 हजार 410 रुपये असा एकूण 8 लक्ष 85 हजार 410 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोहेकाँ.बारसे, पो.ना.अहेर, संदीप टाकसाळ, पोहेकॉ.राम धामोडे यांनी केली.

या आरोपींवर करण्यात आली कारवाई..
आरोपी दिपक गाढे, मो.सरफराज मो.जब्बार, राजु सुरोशे, एकनाथ जवकार, नंदकिशोर अग्रवाल, गणेश फदाट, शुभम गवते, गोपाल पुदाके, प्रभाकर जाधव, दुर्गेश गुंजाळकर, सुरेश सगट, राजेश सपकाळ, बाळु गावंडे यांच्यासह 16 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 4 व 5 अन्वये चिखली पोस्टे.ला पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.