माहोरा येथे आयशर व अ‍ॅपेचा अपघात; बुलढाणा जिल्ह्यातील ५ जण ठार !

375

बुलढाणा(BNUन्यूज) जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे आज सायंकाळच्या ५ वाजेच्या सुमारास शिवम ढाब्याजवळ टाटा आयशर व अ‍ॅपेचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये अ‍ॅपेमधील ५ जण ठार झाले. मृतकामध्ये बुलढाणा तालुक्यातील माळवंडी येथील चौघांचा समावेश असून १ दे.राजा तालुक्यातील आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या एका जणावर जाफ्राबाद येथे उपचार सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार टाटा कंपनीचे अयशर एम.एच.-२८ बी.बी.२३५७ या वाहनाने जाफ्राबादकडे जाणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा क्र.एम.एच.-बी-०२५६ ला जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की अ‍ॅपेचा अक्षरश: चुराडा होवून अ‍ॅपे पलटी होवून अ‍ॅपेमधील सर्वजण रोडवर पडले होते. या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बबन तिरूरवे (वय २६) रा.त्र्यंबकनगर दे.राजा, प्रविणबी राजु शहा (वय २५), आलीया राजु शहा (वय ७), मुस्कान राजु शहा (वय ३) तयक अशफक शहा (वय १९) सर्व रा.माळवंडी अशी ५ जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.