चिखली तालुक्यातील केळवद फाट्यावर अपघात; दोघे गंभीर

754

अभय जंगम
बुलढाणा(BNUन्यूज) चिखली तालुक्यातील केळवद फाट्यावर स्वीफ्ट डिझायर व ऑटोचा अपघात झाला. यामध्ये ऑटोमधील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल केले. जमखी दोंघाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

खामगाव बोथा घाटात दुपारी 2 वाजेच्या सुमारास एसटी.बसच्या घडकेत 2 जण ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेला 6 तास उलटत नाही तोच चिखली तालुक्यातील केळवद फाट्यावर रात्री 8 वाजता कार व ऑटोची धडक झाली. यामध्ये ऑटो पलटी झाल्याने त्यामधील दोन युवक गंभीर जखमी झाले. त्या युवकांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यान रक्तस्त्राव झाल्याने युवक बेशुध्द पडले होते, ग्रामस्थांना घटनास्थळावर धाव घेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णलयात हलविण्यात आले. जखमींची ओळख पटलेली नाही. तर घटनास्थळावरुन पळ काढणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारचे टायर फुलल्याने केळवदच्या 2 ते 3 कि.मी.अंतरावर बंद अवस्थेत मिळून आली.