मोताळा(BNUन्यूज) मलकापूर येथील जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आतापर्यंत जाणीवच्यावतीने शेतकऱ्यांचा शेलाटोपी तसेच समाजातील गोरगरीबांना किराणा व अन्नधान्याचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना मदत देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. असाच स्तूत्य उपक्रम मोताळा येथील प्रांजल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यायल येथे राजाराम बापू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्या संचालनात 18 नोव्हेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजीत करुन 130 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
मोताळा येथे आयोजीत मोफत नेत्र तपासणी शिबिरात जवळपास 130 रुग्णांची तपासणी करुन 50 रुग्णांना डोळ्यांचे ड्रॉपचे वाटप करण्यात आले, तर 25 गोरगरीब रुग्णांना जाणीव फाऊंडेशन यांच्यावतीने मोफत चष्म्यांचे वाटप करणार असल्याचे जाणीवच्या अध्यक्षा कु.प्रांजली धोरण यांनी यावेळी सांगितले. शिबिराचे उद्घाटन अॅड.साहेबराव मोरे, अॅड.विनोद घोंगटे, राजेंद्र वाघ, अॅड.जयंत तायडे, अॅड.सुनील मराठे, अॅड.दीपक भोकरे, अॅड.वैभव खराटे, प्रांजल महाविद्यालयचे अध्यक्ष पवन जाधव, कु.प्रांजली धोरण यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन करण्यात आले. शिबिरामध्ये रुग्णांची मोहनराव नेत्रालय नांदुरा येथील जनसंपर्क अधिकारी मारोती देशमाने, विजय राजपूत, गजानन घोगले, अमोल देशमुख, शाम इंगळे यांनी तपासणी केली. या शिबिराला मोताळा तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जाणीव फाऊंडेशनचे सदस्य विलास जुनारे, सचिन ढोण, सतीश भिसे, प्रीतीताई कथने, राजेंद्र वाघ, विजय भाऊ दोडे, गणेश वाघ, अॅड.जयंत तायडे, अमोल राजपूत, राहुल मच्छरे, नितीन गवई, मनोज यादव यांनी परिश्रम घेतले.