मुर्ती फाट्यावर दुचाकीचा भिषण अपघात; 1 गंभीर

2170

बुलढाणा (BNUन्यूज)- मोताळा-बुलढाणा रोडवर मुर्ती फाट्याजवळ आज दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास पुढे असलेल्या दुचाकीला धक्का लागल्याने दूचाकी स्लीप होवून त्यामध्ये उऱ्हा ता.मोताळा येथील विठ्ठल पाटील गंभीर झाल्याची घटना घडली. जखमीला 3 वाजता एका वाहनाने बुलढाणा  येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उऱ्हा येथील माऊली उर्फ विठ्ठल पाटील व शुभम मापारी हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.28 क्यू.4918 ने बुलढाणा येथून मोताळाकडे परत येत असतांना त्यांच्या दुचाकीचा समोर मोताळाकडे जाणाऱ्या पल्सरला धक्का लागल्याने विठ्ठल पाटील यांची गाडी स्लीप होवून ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना मदत न मिळाल्याने ते जवळपास 15 मिनीटे रोडवरच पडलेले होते. धडक दिलेली पल्सर मात्र मोताळ्याच्या रस्त्याने निघून गेल्याचे विठ्ठल पाटील यांच्यासोबत असलेल्या शुभम मापारी यांनी सांगितले.

शिवसेना नगर सेवक मदतीला धावले..

मोताळा नगर पंचायत नगर सेवक गणेश पाटील दरम्यान बुलढाणा येथून येत होते. त्यांना सदर अपघात दिसला यावेळी गणेश पाटील व दुचाकीने आलेले शिवसेना नगर सेवक सचिन हिरोळे यांनी जखमी विठ्ठल पाटील यांना एका खाजगी वाहनाने बुलढाणाकडे पुढील उपचारार्थ रवाना केले.