जुना वाद कोणता; सस्पेंन्स मात्र कायम?
buldanannewsupdate.com
बुलढाणा (17 Dec.2022)बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या वनविभागाच्या भडगाव जंगलात, 14 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान लताबाई कोतकर या महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी महिलेचा मुलगा विकास कोतकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेणे पोलिसाममोर एक मोठे आव्हान होते. ठाणेदार राजवंत आठवले व त्यांच्या टीमने या क्लिष्ट प्रकरणाचा छडा लावीत आरोपी बाळासाहेब बारहते याला दोन दिवसांच्या परिश्रमानंतर बेड्या ठोकल्या. आज 17 डिसेंबर रोजी त्याला बुलढाणा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. परंतु जुना वाद नेमका कोणता होता, हे मात्र एक कोडचं बनल आहे.
सैलानी येथील खून प्रकरणाची माहिती देण्यासाठी आज 17 डिसेंबर रोजी बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी पत्रकार परिषद घेवून रायपूर पोस्टे.चे ठाणेदार राजवंत आठवले व त्यांच्या टीमने क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा करीत आरोपीला दोन दिवसांच्या परिश्रमनंतर अटक केल्याने त्यांचे कौतूक केले. बाळासाहेब मुंजाजी बारहते रा. साडेगाव ता.जिंतूर जि.परभणी ह.मु.सैलानी हा मृतक महिलेसोबत राहत होता. काही दिवसापुर्वी आरोपी बाळासोहब व लताबाई यांच्यात वाद झाला होता. या वादातून आरोपीने लताबाई कोतकर यांना 13 डिसेंबरला जळतण तोडण्याच्या बहाण्याने भडगाव शिवारातील वनविभागाच्या जंगलामध्ये नेले व तेथे लताबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन तीला मारले, ओळख पटू नये म्हणून तीचे डोके व चेहरा दगडाने ठेचल्याची कबुली दिली. रायपूर पोलिसांनी आरोपी बाळासाहेब बारहते याला आज 17 डिसेंबर रोजी बुलढाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. घटनेत आणखी काही आरोपी आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहे. परंतु जुना वाद एवढा मोठा होता की, ‘बाळू’ ने लताबाईवर कुऱ्हाडीने वार करुन तीला संपविले, तो वाद नेमका कोणता होता, हे मात्र सध्यातरी एक कोडचं बनल आहे.?