सैलानी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून मर्डर!

653

अज्ञात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल

buldanannewsupdate.com
रायपूर(15Dec.2022) बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या सैलानी येथे एका 50 वर्षीय महिलेचा निर्घृण मर्डर (MURDER)केल्याची घटना 14 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली असून मृतक महिलेचे नाव लता मुरलीधर कोतकर असे आहे. ती सुलतानपूर ता.खुलताबाद जि.औरंगाबाद येथील राहिवासी आहे. मृतक महिलेचा मुलगा विकास कोतकर यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोस्टे.ला अज्ञात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैलानी येथे राज्यभरातून अनेक भक्तगण व शारिरीक व्याधी असलेले लोक श्रध्देपोटी येथे दर्शनासाठी येतात. लता मुरलीधर कोतकर या महिलेला मागील 10 वर्षापासून पायाचा त्रास असल्याने त्या सैलानी येथे नेहमी दर्शनासाठी येत होत्या व तेथेच मुक्कामी राहत होत्या. दरम्यान 14 डिसेंबरच्या रात्रीच्या 9 वाजेच्या दरम्यान लताबाईचा अज्ञात इसमाने डोके दगडाने ठेचून त्यांचा निर्दयीपणे निर्घृण खून केला. लताबाईची मुलगी सपना दिपक खिल्लारे आईच्या भेटीला सैलानी येथे आल्या असता त्यांची आईसोबत भेट झाली नाही. त्यांना सैलानी येथे समजले की, भडगाव येथील वनविभागाच्या जंगलात एका महिलेचे प्रेत सापडले, त्यांनी घटनास्थळी पाहिले असता त्यांना लताबाई मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. त्यांनी सदर घटनेची माहिती त्यांचा भाऊ विकास मुरलीधर कोतकर सुलतानपूर जि.औरंगाबाद यांना दिली. विकास यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोस्टे.ला अज्ञात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिकाऱ्यांनी केली घटनास्थळाची पाहणी
उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हे घटनास्थळावर तळ ठोकून होते. तर आज 15 डिसेंबर अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी घटनास्थळी दाखल होवून त्यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रायपूर पेास्टे.चे ठाणेदार राजवंत आठवले, पोलिस कर्मचारी जाधव, गवई, पालवे, चीटवार हजर होते.

आरोपीने खून कोणत्या उद्देशाने केला..
आरोपीने सैलानी बाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लताबाईचा खून का व कश्यासाठी केला. आरोपीने दगडाने ठेचून निर्घृणपणे लताबाईला का मारले, हे सस्पेन्स मात्र आरोपीला पकडल्या नंतरच उघडकीस येईल, एवढे मात्र निश्चीत!