पीक कर्ज योजनेचा सुलभरित्या लाभ द्या; खा.जाधवांची हिवाळी अधिवेशानामध्ये मागणी

201

buldananewsupdate.com
बुलढाणा(22Dec.2022) शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जाच्या नियमावलीत फेरबदल करुन सोप्या व सुधारीत पध्दतीने बळीराजाला पीक कर्जाचा लाभ देण्याची मागणी खा. प्रतापराव जाधव (MP.PRATAPRAO JADHAO) यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशानामध्ये लावून धरली.

यावेळी खा.प्रतापराव जाधव यांनी सध्यस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज (PIK KARJ)वाटपसंबधी वेगवेगळया अडचणिंना सामोरे जावे लागत असून पीककर्ज वाटप करणाऱ्या सर्वच बँक शेतकऱ्यांचे सिबील तपासत आहे. ज्या शेतकऱ्यांचे सिबील (CIBIL) कमी आहे. अशांना पीक कर्ज देण्यास असमर्थता दर्शविण्यात येते, त्याचबरोबर संबधित शेतकऱ्यांच्या सहकर्जदाराची सिबील तपासून त्यांनाही कर्ज देण्यासंबधी टाळाटाळ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण आर्थिक उलाढाल ही निसर्गावर अवलंबून असते. निसर्गाच्या परिस्थीतीचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे . वर्तमान स्थितीत अतिवृष्टी व वातावरणातील बदलामुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा निर्माण झाला आहे. अश्यातच पीक कर्ज भरण्यास थोडाफार वेळ लागत असल्याने त्यांच्या सिबील स्कोरमध्ये फरक पडतो. नियमीत परंतु उशीरा कर्ज भरणाऱ्या लोकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.

अवधीत कर्ज भरणाऱ्या किंवा वन टाइम सेटलमेंट करून कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाल्यामुळे त्यांना नवीन कर्ज पुरवठा बँकांकडून करण्यात येत नाही. केंद्रिय कृषी मंत्र्यांनी व अर्थमंत्र्यांनी बँकेच्या नियमावलीत बदल करुन शेतकऱ्यांना सुलभ दृष्टीने कर्ज मिळावे, अशी मागणी खा.जाधव यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लावून धरली.