लोणार तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचितच!

162

तात्काळ मदत न दिल्यास आंदोलन छेडणार-शैलेश सरकटे

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा ( 7 ‍Feb. 2023) लोणार तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोंबर 2022 मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. शासनाने मदत जाहीर करूनही अद्याप सदर शेतकरी मदतीपासून वंचित आहे. त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अन्यथा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा युवा नेते शैलेश सरकटे यांनी 6 फेब्रुवारी रोजी लोणार तहसिलदारांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

लोणार तालुक्यातील काही ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या चुकीमुळे 24 गावांमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार होऊ शकली नाही. त्यामुळे लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा अतिवृष्टीचा लाभ मिळाला नाही. शासनाने सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन 7 दिवसाच्या आत प्रलंबित गावातील याद्या तयार करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह पीक विम्याची मदत देण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा लोणार तहसील कार्यालयावर काढण्याचा इशारा युवानेते शैलेश सरकटे, प्रवीण देशमुख, जीवन घायाळ यांनी तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी रवि हाडे, धीरज मोरे, ज्ञानेश्वर सरकटे,विजय मोरे,मयूर हाडे, विशाल तनपुरे, विजय सरकटे यांच्यासह तालुक्यातील शेकडो उपस्थित होते.