पोलिसांची शोध मोहीम; मात्र रविकांत तुपकर आत्मदहनाच्या भुमिकेवर ठाम !

199

विमा कंपन्यांनी घेतला धसका; शेतकऱ्यांच्या खात्यात केले ९ कोटी ७८ लाख जमा

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10 ‍Feb. 2023) शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई व सोयाबीन – कापसाच्या दरवाढ याबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली असून एक तर आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला असा आक्रमक पवित्रा घेत, आता मागे हटणार असा दम सरकारला दिला असून शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पीकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केल्याने प्रशासनासह शेतकऱ्यांच्या नजरा रविकांत तुपकरांकडे लागल्या असून ते 11 फेब्रुवारीला काय करणार? की शासन, प्रशासन वेळीच यावर तोडगा काढेल, हे मात्र उद्याच समजेल!

रविकांत तुपकरांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर AIC पिकविमा कंपनीने ९ फेब्रुवारीच्या रातोरात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पात्र १५,२२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी ७८ लाख रु. जमा करण्यास सुरवात केली आहे. अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. परंतु नैसर्गिक आपत्ती अंतर्गत असलेल्या सर्वच पात्र अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा व्हावी, पोस्ट हार्वेस्टिंगचा विमाही तातडीने मिळावा व अतिवृष्टीची मंजूर असलेली नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी. तसेच सोयाबीन – कापूस दरवाढी संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावे, या मागण्यांबाबत तुपकर ठाम आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. ज्यांना मिळाली त्यांना अतिशय तुटपुंजी मदत आहे व अतिवृष्टीचे जिल्ह्यासाठी १७४ कोटी रु. मजूर असूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेले नाही. शिवाय हजार शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन व कपाशीला दर नसल्यामुळे माल तसाच घरात पडू नये त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना सरकार विरोधात तीव्र आहेत. त्यामुळे शेतकरी या आंदोलनात मोठ्या संखेने सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आंदोलन भावनेच्या भरात जर कोणताही अनुचीत प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.

घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त..
रविकांत तुपकर ४ दिवसांपासून भूमिगत आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. तुपकर घराला पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पण तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने ते आज कुठून येतील हे सांगता येत नाही व आंदोलनात काय घडेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.