उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या 33 पोलिस अधिकाऱ्यांचा अमरावती विशेष पोलिस महानिरीक्षक नाईकनवरे यांच्या हस्ते गौरव !

278

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10 ‍Feb. 2023)खरचं पोलिस म्हटले की समोर येते खाकीवर्दी, त्या खाकीवर्दीतील कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिक निर्भीडपणे जीवन जगतो. मात्र त्या पोलिसांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये त्रास सहन करावा लागतो. महत्वाचे कामे असतांना सुध्दा कर्तव्यावर हजर रहावे लागते..! त्यातच वाढती गुन्हेगारी, चोरी यासह विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडणे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असते. ते आव्हाने पोलिस समर्थपणे पार पाडीत असतात. एखादा गुन्हेगार सापडला नाही की, त्याचे खापर पोलिस अधिकाऱ्यांच्या माथी फोडल्या जाते. बुलढाणा जिल्ह्यात सन 2022 मध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्हे, संवेदनशील गुन्ह्याची उकल, गुन्हेगारांचा शोध घेणे, खुनातील आरोपींना पकडणे, अशी उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल जिल्ह्यातील 33 पोलिस अधिकाऱ्यांचा अमरावती विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

अमरावती परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या अमरावती परिक्षेत्रातंर्गत बुलढाणा जिल्हा पोलीस विभाग वार्षिक निरीक्षण दौऱ्याचा पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे १० फेब्रुवारी रोजी समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा दरबार घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा पोलीस दलाकडून सन २०२२ मध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत पोलिस अधिकाऱ्यांना प्रोत्साहीत केले. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड, अप्पर पोलिस अधिक्षक बाबुराव महामुनी, खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी, खामगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, बुलडाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, विलास यामावार उपविपोअ. मेहकर/ दे.राजा, स्थागुशा प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक एन.लांडे तसेच सर्व ठणेदार आणि शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थीत होते.

यांचा करण्यात आला सत्कार..

विशेष पोलिस निरिक्षक जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२२ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात दाखल असलेले ‘गंभीर, संवेदनशील गुन्ह्यांची उकल, गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास, आरोपी शोध घेवून उत्कृष्ट कामगीरी बजाविणाऱ्या अशोक थोरात अपोअ. खांमगांव, बी.बी.महामुनी अपोअ.बुलढाणा, अभिनव त्यागी उपविपोअ मलकापूर,अमोल कोळी़ उपविपीअ खामगांव, विलास यामावार उपविपोअ मेहकर/दे.राजा, सचिन कदम उपविपोअ बुलढाणा स्थागुशा.पोलिस निरीक्षक प्रभारी अशोक लांडे, पोलिस निरिक्षक बळीराम गिते पोलिस स्टेशन बोराखेडी, एफ.सी.मिर्झा पो.स्टे.मलकापूर ग्रामीण, पोनि. सुरेश नाईकनवरे पो.स्टे. खामगांव ग्रा., पोनि.शांतीकुमार प्राटील पोस्टे.सायबर, पोनि.अनिल गोपाळ पो.स्टे. शेगांव शहर.,पोनि. श्रीमती निर्मला परदेशी पो.स्टे,मेहकर; सपोनी. राजवंत आठवले पोस्टे.रायपूर, पोनी. गिरीश ताथोड प्र.पो.उप-अधी(मुख्यालय), सपोनि. गणेश. हिवरकर पो.स्टे.अंढेरा, सपोनि. जितेंद्र आडोळे वाचक पोअ.बुलढाणा, सपोनि.विलासकुमार सानप, अमित वानखडे, मनिष गावंडे, पोउपनि. सचिन कानडे, श्रीकांत जिंदमवार स्था.गु.शा. बुलढाणा, पोउपनि. अमोल बारापात्रे पो.स्टे. चिखली, सपोनि. सचिन चव्हाण जि.वि.शा.बुलढाणा, सपोनि. श्रीमती प्रियंका गोरे पो.स्टे. बुलढाणा शहर, गोकुलसिंग राठोड, दोषसिध्दी विभाग बुलढाणा, पोउपनि.दिनेश शिरेकार सीसीटीएनएस विभाग बुलढाणा, चतरसिंग सोळंके राखीव पो.निरीक्षक, पोनि. सादिक अकबर पठाण मोटार परिवहन विभाग बुलढाणा रिजय रिंढे-कार्यालय अधीक्षक पो.अ.कार्यालय बुलढाणा यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.