बुलढाण्यात छत्रपतींच्या मेळ्यात ‘संभाजी’ होणार सहभागी; अभिनेते खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार शिवजयंतीचे उद्घाटन!

255

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (9 ‍Feb.2023) छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर जीवंत उभा करण्याचे समर्थशाली काम डॉ. अमोल कोल्हे (AMOL KOLHE )यांनी केले ‘स्वराज्य रक्षक संभाजी’च्या माध्यमातून घराघरात छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवराय पोहोविण्याचे श्रेय खासदार अमोल कोल्हे यांनाच दिले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पेहरावत त्यांना पाहण्याची दर्शकांना झाली आहे. रुपेरी पडद्यावरील हा ‘रांगडा कलावंत’ बुलडाणेकराणा प्रत्यक्ष पाहता येणार असून शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी कोल्हे हे शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे.

बुलडाणा शहरात साजरी होणारी शिवजयंती आगळीवेगळी विक्रम प्रस्थापित करणारी ठरत आहे. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले यांनी तर वाहून घेतल्यागत कामाला सुरुवात केली असून सर्व टीम त्यांना सहकार्य करीत असून हा सोहळा ऐतिहासीक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना तितकंच उत्कंठ प्रतिसाद बुलढाणा वासीयांचा मिळत आहे. शहरातील डॉक्टर्स, व्यापारी, मुस्लिमधर्मीय आणि शिवप्रेमी असा हा ‘छत्रपतींचा मेळा’ भरणार असून डॉ.खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन होणार आहे. राज्यात शिवजयंतीचा आगळावेगळा प्रयोग बुलडाण्यातून सुरू झाला. हा लोकोत्सव अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीने यावर्षी उंचीवर पोचणार आहे.

भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..
शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन, गड किल्ले चित्र प्रदर्शनी, व्याख्यान, पोवाडे, शिवज्योत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य दिव्य शोभायात्रा असा ‘भरजरी थाट’ यंदाच्या शिवजयंतीला लाभला आहे. वेगवेगळ्या समित्यांची निवड ही करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती..
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, (GULABRAO PATIL) खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय गायकवाड, आ.धीरज लिंगाडे, जिल्हाधिकारी एच.पी.तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड, जि.प.सीईओ. भाग्यश्री विसपुते यांच्यासह राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती राहणार आहे.