शेतकऱ्यांसह वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर लाठीमार करुन बुलढाणा पोलिसांनी काय मिळविले?

380
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन

शेतकरीनेते रविकांत तुपकरांचे आत्मदहन आंदोलन चिघळले!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (11 ‍Feb. 2023) अन्याय, अत्याचार तसेच न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिला आहे. याच अधिकारांचा वापर करीत शेतकरीनेते रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शनिवार 11 फेब्रुवारी ठरल्याप्रमाणे पोलिसांपेक्षा पावरफुल्ल नेटवर्क ठेवीत गनिमी काव्याचा वापर करीत पोलिसांना गुंगारा देत पोलिस वेशात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेलची कॅन घेवून आत्महदन करण्याचा प्रयत्न करीत असतांना बुलडाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी शहर पोलिसांनी अचानकपणे शेतकरी, महिला व वार्ताकंन करणाऱ्या पत्रकार यांच्यावर लाठीमार करुन पोलिसांनी काय मिळविले, असा प्रश्न या अनुषंगाने कायद्याच्या राज्यात उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचा फक्त मतांसाठी वापर केल्या जातो, प्रत्यक्षात मात्र त्यांना गाजरच दिले जाते. आज जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाची दयनीय अवस्था झाली असून सततची नापीकी कर्जबाजारीला कंटाळून तो आत्महत्या करीत आहे. एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे किंमत एका आमदारांच्या महिन्याच्या पगारापेक्षाही कमीच आहे, केव्हढी ही शोकांतीका आहे. शेतकरीनेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पीकविमा, अतिवृष्टीची मदत आणि सोयाबीन-कापसाची दरवाढ या प्रमुख मागण्यांसाठी तुपकरांनी शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आज 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तुपकरांनी पोलिसांच्या नजरा चुकवित पोलिस वेशभूषेत या मोर्चात दाखल होवून अंगावर डिझेल ओतून त्यांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. आंदोलन शांततेत सुरु होते, परंतु पोलिसांनी अचानक लाठी चार्ज सुरु करुन वृद्ध शेतकरी, महिला आणि युवकांना गुन्हेगारांप्रमाणे लाठीने झोडपले यावेळी वार्तांकनासाठी गेल्याने पत्रकारांना सुध्दा पोलिसांनी मारहाण केल्याने तुपकरांचे आंदोलन चिघळले असून तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. माजी मंत्री आ.राजेंद्र शिंगणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना पोलिसांनी अडविल्याने हे आंदोलन चिघळले असून ते तीव्र होईल का? सदर प्रकरण पोलिस प्रशासन कसे हाताळते? पत्रकार, शेतकरी व राजकीय नेत्यांना कसे शांत करते, हे ही पाहणे औत्सुकतेचे राहील, एवढे मात्र खरे!

बुलढाणा पोलिस सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहे का?
देशातील सर्वाच्च न्यायलयाने पत्रकारांना पोलिस स्टेशनमध्ये व्हीडीओ शुटींग व फोटो काढण्याचे अधिकार दिले असतांना सुध्दा पत्रकारांना फोटो काढण्यास, शुटींग घेण्यास पोलिसांनी मज्जाव करुन मारहाण करणे, ही बुलडाणा शहर पोस्टे.ठाणेदार प्रल्हाद काटकरची ही भुमीका लोकशाहीला शोभणारी नव्हती. पत्रकारांना मारहाण विरोधात पत्रकारांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करुन शहर पोलिसांचा निषेध व्यक्त केला. शेतकरी व पत्रकारांवर लाठीहल्ला करुन पोलिसांनी कोणते मोठे बक्षीस मिळविले का? बुलढाणा पोलिस सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहे का? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.