तालसवाडा येथे भिषण अपघात; मोहेगाव येथील तीन ठार

2437

मलकापूर-जळगाव(खां.) हायवेवरील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (12 ‍Feb. 2023) मलकापूर-जळगाव हायवे नंबर 6 वर आज 12 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास तालसवाडा पुलावर टिप्पर व आयशरची समोरासमोर भिषण धडक झाली. ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील 3 जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे.

मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील आयशर हे विटांचा माल घेवून मुक्ताईनगरकडे जात होते, दरम्यान आशयर व टिप्परची सकाळच्या सुमारास दसरखेड नजीक असलेल्या तालसवाडा पुलावर समारोसमोर भिषण धडक झाली. या धडकेत आयशच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. यामध्ये राजू रतन चव्हाण, जीवन सुरेश राठोड व सुनिल ओंकार राठोड रा.मोहेगाव यांचा घटनास्थळी दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. तर गंभीर जखमी राम मलखंब राठोड यांच्यावर बुलढाणा येथील एक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातामध्ये मोहेगाव येथील तिघांचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.