अंगणवाडी सेविका व मदतनीस पाककृती स्पर्धेचे बक्षिस वितरण

150

संजय निकाळजे
बुलढाणा(BNUन्यूज) एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरीप्रकल्प या विभागातंर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाचेऔचित्य साधून गुरुवार 15 सप्टेंबर रोजी अंगणवाडी क्रमांक 16 सोळंकी ले-आऊट बुलढाणा येथे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची पाककृती स्पर्धा घेण्यात होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महिला व बालविकास अधिकारी रामरामे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेमध्ये सेविका मदतनीस यांनी पोषण युक्त आहाराच्या विविध पाककृती बनवून आणल्या होत्या. प्रमुख अतिथींनी पाककृतीची पाहणी करून चार पोषण युक्त आहाराचे क्रमांक दिले. त्यात प्रथम क्रमांक कांता दराडे, द्वितीय क्रमांक सुरेखा निकाळजे, तृतीय क्रमांक सुरडकरताई , बुलकुडे ताई ,चतुर्थ क्रमांक सुवर्णलता सुरडकर तर प्रोत्साहन पर बक्षीस अनिता ठाकरे यांना रामरामेसर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पोषण मटका याला विशेष बक्षिस देण्यात आले. पोषण मटका रेखा घेवंदे यांनी बनून आणला होता. त्याचप्रमाणे सेविका व मदतनीस यांनी पोषण फुगडी नृत्य सादर केले तसेच सासुरवाशी सून रुसून बसली कैसी हे नृत्य सादर केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याधिकारी महिला बाल विकास रामरामे, सोळंकीसर आहार तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय, सपकाळ विस्तार अधिकारी बुलढाणा , मराठे मॅडम जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा , सुपरवायझर गिरी मॅडम बुलढाणा यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शारदा इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णलता सुरडकर यांनी तर आभार साबणकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सेविका मदतनीस यांनी अथ्थक परिश्रम घेतले.