लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे मास्कोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण बुलडाण्यात अण्णाभाऊ साठे फोरमच्यावतीने जल्लोष!

189

संजय निकाळजे
बुलडाणा (BNU न्यूज)- जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून रशियाची राजधानी मॉस्को येथे मार्गारिटा रुडमिनो आँल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरच्या आवारात जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व भव्य अशा तैलचित्राचे अनावरण १४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याचा बुलडाण्यात जल्लोष करण्यात आला.

जगविख्यात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी १२ स्पटेंबर १९६० मध्ये मुंबई ते रशिया मास्कोत जाऊन तेथील सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक , क्षेत्रात केलेली प्रगती तसेच मुख्यत: तेथील श्रमिक वर्गाचे वर्णन रशियाची प्रभावी करणारी संस्कृती, कामगार चळवळ ,काँमरेड लेनिनं केलेली क्रांती मार्क्सचे महान तत्वज्ञान इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून आपल्या लेखणीतून प्रभावीपणे जगासमोर मांडणाऱ्या या अविस्मरणीय अनावरण सोहळ्यानिमित्त बुलडाणा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सोशल फोरम बुलडाणाचे वतीने व विविध संघटनेचे प्रतिनिधी तसेच पदाधिकारी यांच्या वतीने जयस्तंभ चौक व अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ फटाक्यांची आतिषबाजी करून अण्णाभाऊ साठेंच्या नावाने घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला . यावेळी अण्णाभाऊ साठे सोशल फोरम चे महासचिव बि.के.खरात, विदर्भ सल्लागार ॲड.डिगांबर अंभोरे , लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे , अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष भगवान गायकवाड, ता.अध्यक्ष .गजानन गायकवाड , एकनाथराव निकाळजे, ओमप्रकाश नाटेकर , राम जाधव , राजू नाटेकर , रामेश्वर जाधव , आर.टी.जोगदंड , रमेश ईंगळे , सुर्यकांत जाधव ,मनीष गायकवाड , उत्तम बाजड पी.डी.महाले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.