Thursday, April 30, 2026
Home Crime नांदेड जिल्ह्यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव फसला चालकासह ऑटामध्ये होती...

नांदेड जिल्ह्यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव फसला चालकासह ऑटामध्ये होती बुरखाधारी महिला :मुलीने सांगितली पोलिसांना आपबिती

310

नांदेड(BNU न्यूज) राज्यात मुले चोरी करणारी टोळी म्हणून अनेक निरपराधांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे सुध्दा दाखल झाले आहेत. मुले चोरी करणारी टोळी सक्रीय नसल्याचे अनेक ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले. परंतु नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरालगत असलेल्या गोकुंदा येथील दत्तनगर भागातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार 23 सप्टेंबर रेाजी समोर आला असून मुलीचे नाव श्वेता दत्ता झळके असे आहे. त्या मुलीने आपल्या सतर्तकतेमुळे अपहरणाचा हाणून पाडला आहे.

गोकुंदा येथील दत्तनगरमध्ये राहणारी श्वेता झळके ही १३ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना अचानक तिच्या पाठीमागून एक रिक्षाचालक आला. त्याने श्वेताला मारहाण करत रिक्षात बसवले आणि तिच्या तोंडावर रुमाल टाकून बेशुद्ध करत किनवट रेल्वे स्टेशन परिसरात नेले. श्वेताला 23 सप्टेंबरच्या दुपारी २ वाजताच्या सुमारास शुद्ध आल्याने तिने रिक्षावाल्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. नंदिग्राम एक्सप्रेस किनवट रेल्वे स्थानकावर आल्यानंतर स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याने श्वेताला गर्दीचा फायदा घेत तीने आपले घर गाठले. श्वेताने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरी आईला आणि आजीला सांगितला. दत्तनगर भागातील नागरिकांनी श्वेताला किनवट पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी श्वेताची चौकशी करून तिला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठविण्यात आले.

रिक्षात बुरखा घातलेली महिला व चार पुरुष होते..
श्वेताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रिक्षात एक बुरखा घातलेली महिला आणि चालक पुरुष असे दोघेजण होते. ते दोघेजण नेमके कुठून आले होते? ते किनवट शहरातील होते का? अपहरण करण्यामागचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न या घडलेल्या अपहरण प्रकरणानंतर चर्चिले जात आहेत. किनवट शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं असून किनवट पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Don`t copy text!