इश्काचा खेळ लई भारी… चुलत बहिणीच्या प्रेमासाठी मुलाने आईला धाडले यमसदानी!

300

ठाणे (BNU न्यूज) प्रेमासाठी वाट्टेल ते खरे…पण त्या प्रेमाला काही सिमा, बंधने व मर्यादा असतात. परंतु ज्या ठिकाणी प्रेमाचा नावलेशही नसतो, तेथे प्रेम कसे होते, याला प्रेम म्हणावे की शारिरीक वासना हेच कळत नाही. जे केवळ शारिरीक आकर्षणामुळे एकमेकांजवळ येतात, त्या ठिकाणी वासनेचा खेळ सुरु होतो, वासनेपोटी सर्व नात्यांना तिलांजली दिली जाते. असाच धक्कादायक प्रकार भिवंडीतील काल्हेर येथे उघडकीस आला आहे. विवाहीत चुलत बहिणीच्या इश्कात पागल झालेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच यमसदानी धाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी त्या चुलत बहिण भावाला जेरबंद केले आहे.

भिवंडी येथील 29 वर्षीय कृष्णा अंबिकाप्रसाद यादव याचे त्याची चुलत बहिण बबिता यादव हिचेशी अनैतिक संबंध होते, नात्यात या संबंधाला स्थान नसल्याने कृष्णाच्या आईने याला आक्षेप घेतला होता. परंतु कृष्णा यादव हा आपल्या विवाहित चुलत बहिणीच्या इश्कात एवढा पागल झाला होता की त्याने आपल्या विवाहीत प्रेयशीच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईलाच यमसदानी धाडले आहे. कृष्णाने आई अमरावती यादव (वय 58) ही घरात गाढ झोपेत असताना तिच्यावर हल्ला केला. प्रियशी चुलत बहिण बबीताने खोलीत प्रवेश करीत बेल्टने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी महिलेचा मृतदेह खोलीच्या कपाटात ठेवून कृष्णाने इमारतीच्या बाहेर उडी मारली आणि त्याच्या चुलत बहिणीला मृतदेह इमारतीबाहेर फेकण्यास सांगितले. यावेळी आरोपी कृष्णाचे वडील घटनास्थळी आल्याने कृष्णाने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले.

आरोपी कृष्णाचे वडील आणि लहान भावाने आईचा मृतदेह पुन्हा घरात आणला. जेव्हा आरोपीच्या वडिलांनी त्याला या घटनेबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की चोरांच्या टोळीने त्यांना मारहाण करुन लुटले. चोरट्यांनी आईवर हल्ला केल्याने प्राण गमवावे लागले, असा कांगावा कृष्णाने केला. आरोपीने आईला चोरट्यांनी मारहाण केल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला. नारपोली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत तिचा मृतदेह घरात ठेवलेला होता. पोलिसांना आरोपीचा दावा संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी माहिती घेत तपासचक्रे फिरविली असता, आरोपी कृष्णा यादव याचे चुलत बहीण बबिता पल्टुराम यादव हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले. नंतर त्याने बहिणीच्या मदतीने आईची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मृतक अमरावती यादव यांचा भाऊ जगदीश यादव यांच्या फिर्यादीवरुन भिवंडीतील नारपोली पोस्टे.ला आरोपी विरुध्द भादंवीचे कलम ३०२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल आरोपींना अटक केली आहे.