मुलीला भाऊबीजसाठी आणायला गेलेल्या इसमाचा वाटेतच हृदविकाराने मृत्यू !

325

बुलढाणा (BNUन्यूज) दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. भाऊबीजला अनेक मुली माहेर येतात. मुलीला भाऊबीजसाठी माहेरी आणण्यासाठी निघालेल्या बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील गजानन जंजाळ यांचा आज गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी वाटेतच हृदविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सकाळी 11.45 वाजेच्या दरम्यान भोकरदन येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील गजानन सुखदेव जंजाळ (वय 50) हे आज 27 ऑक्टोबर रोजी मुलीला आणण्यासाठी जाफ्राबाद तालुक्यातील कोल्हापूर येथे निघाले होते. परंतु जातांना रस्त्यानेच त्यांना हृदविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सदर घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.पैठणकर मॅडम यांनी जाफ्राबाद पोस्टे.ला दिली. याबाबत जाफ्राबाद पोस्टे.ला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जंजाळ यांच्या आकस्मात मृत्यूने चांडोळ गावावर शोककला पसरली आहे.