अतिक्रमण धारकांच्या न्याय्य हक्कांसाठी समता संघटनेचा 26 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा

398

@buldananewsupdate.com

बुलढाणा(24Dec.2022) गायरान जमिनीवर अनेक वर्षापासून भूमीहीन ,शेतमजुर, अनुसूचित जाती जमातीचे, भटके विमुक्त व अन्य मागास जे जमिनी विकत घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत अशा लोकांनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण कायम करण्यासाठी समता संघटनेच्यावतीने 26 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ गवई यांच्या नेतृत्वात भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो अतिक्रमण धारक महिला व पुरुष सहभागी होणार आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशाने सरकार अतिक्रमण धारकांनी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमीत जमिनी अतिक्रमण धारकांच्या ताब्यातून काढून घेत आहे, असे झाल्यास अनेक संसार उघड्यावर येणार होते. परंतु सरकारने स्वतः न्यायालयात याचिका दाखल करून कृषी प्रयोजनासाठीचे झालेले सर्व अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा धोरणात्मक घ्यावा. तसेच वनजमिनीवरील चे अतिक्रमणाचे पट्टे तात्काळ वाटप व्हावे व बहसंख्येने असलेल्या भूमीहीन शेतमजुरांसाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात यावा, स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे, वनहक्क कायद्यातील तरतुदीनुसार वनहक्काचे पट्टे तात्काळ वाटप करण्यात यावे, यासह आदी न्याय्य मागण्यांसाठी समता संघटनेच्या वतीने 26 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ गवई, प्रदेशाध्यक्ष आम्रपाल वाघमारे , कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. काळेसाहेब ,भारतभाऊ पैठणे, प्रांजलीताई धोरण,गजूभाऊ जाधव हे करणार आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजुभाऊ दोडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.