मोताळ्यात प्रभारी सीईओंचा अजब फतवा! नियमीत घरपट्टी व नळपट्टी भरणाऱ्यांना सुध्दा उन्हाळ्यात मिळणार नाही पाणी?

452

1)अवैध नळ कनेक्शन धारकांवर कारवाई केंव्हा?
2)मोताळा शहरात 15 हजार लोक पितात 1749 नळावरुन पाणी
3)1 कोटी घरपट्टी व पाणीकर थकबाकी वसुली थकली!
4)शहरात 2002 मालमत्ता धारकांकडे नळ कनेक्शनच नाहीत!
5)नियमीत कर भरणाऱ्यांना नगर पंचायत व्हॉल बंद ठेवून पाणी कसे पुरवेल?
6) भाडे थकविणाऱ्या गाळे धारकांवर कारवाई केंव्हा करणार?

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (15 Mar.2023)मोताळा नगर पंचायत मुख्याधिकारी विभा वऱ्डाडे यांची बदली झाल्याने येथील नगर पंचायतचा पदभार बुलढाणा नगर परिषद सीईओ यांच्याकडे देण्यात आला. पांडे यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी त्याच कर्तव्यदक्ष पणाचा मोताळा येथे आव आणीत नळाचे व्हॉल्ब सोडविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर वसुली कमी असलेल्या प्रभागातील पाणी पुरवठा व्हॉल बंद ठेवण्याचा फतवा 9 मार्च रोजी जारी केला आहे. त्यामध्ये नळपट्टी न भरणाऱ्यांचे कनेक्शन बंद न करता उलट काढलेल्या फतव्यामध्ये जे नियमीत नळकर व घरपट्टी भरणारे आहेत त्यांना सुध्दा पाणी मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे, ते सुध्दा भविष्यात नियमीत कर भरणा करतील काय? असा प्रश्न या अनुषंगाने सुज्ज्ञ नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.

मोताळा ग्रामपंचयातचे नगर पंचायतमध्ये रुपांतर होवून जवळपास 8 वर्ष झाली आहेत. परंतु मोताळा शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. दोन मुख्याधिकारी आले आणि गेले. कोणी कमाई करुन तर एक काँग्रेसच्या काळात राजकीय झंझट नसल्यामुळे गेल्याची चर्चा आहे. मोताळा नगर पंचायतची घरपट्टी व नळपट्टी ही करोडोच्या घरात बाकी आहे. तसेच नगर पंचायतच्या गाळ्यांचे भाडे अनेकांकडे थकलेले आहे. कित्येकांनी तोंडी गाळे विकून, भाड्याने देवून पैसा कमाविला आहे. गाळे ज्यांनी भाड्यांनी घेतलेले आहेत ते मूळ लोक त्या गाळ्यामध्ये धंदा करीत नसून ते इतरांच्या ताब्यात आहेत. शहरात अनेकांची घरे सिमेंट काँक्रीटची बांधलेली आहेत, त्यांची नगर पंचायतमध्ये टीनपत्राची नेांद असल्यामुळे नगर पंचायत प्रशासनाचे लाखोचे नुकसान होत आहे. बाजारामध्ये अतिक्रमण वाढले असून लाखो रुपये खर्च कलेले आठवडी बाजारातील शौचालय बंद पडले असून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. याकडे कर्तव्यदक्ष सीईओ पांडे लक्ष देतील काय?

मोताळा शहराची सन 2011 च्या जनगणनेनुसार 10 हजार 331 लोकसंख्या होती, आजरोजी लोकसंख्या 15 हजाराच्यावर गेलेली आहे. सन 2021-22 वर्षामध्ये मोताळा शहरात 3751 मालमत्ता(घरे )असून त्यावर 65 लक्ष 34 कर वसुली क्रमप्राप्त असतांना 18 लक्ष 76 हजार रुपयांची वसुली झालेली असून 46 लक्ष 58 हजार रुपये बाकी आहेत. शहराची लोकसंख्या 15 हजाराच्यावर असतांना केवळ 3751 लोकांची घरे असून फक्त 1749 नळ कनेक्शन आहेत. त्यांची एकूण मागणी 62 लक्ष 24 हजार असतांना वसुली केवळ 12 लक्ष 18 हजार वसुल झाली असून 50 लक्ष 6 हजार रुपये बाकी आहेत, हे वैध कनेक्शन घेणाऱ्यांची यादी असून मोताळा शहरात किती अवैध कनेक्शन आहेत याची यादी मात्र मोताळा नगर पंचायत प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

अवैध नळ कनेक्शन धारकांवर कारवाई केंव्हा?
शहरामध्ये 3751 नागरिकांचे घरे आहेत, त्यापैकी 1749 लोकांनी नगर पंचायतकडून नळ कनेक्शन घेतले आहेत, 2002 मालमत्ता धारकांनी नळ घेतले नसल्याची माहिती समोर आली असल्याने एका नळ कनेक्शनवर 15 लोक पाणी भरतात काय? की अवैध नळ कनेक्शन घेवून पाणी भरतात, याचा शोध घेवून नगर पंचायत प्रशासनाने लाखोचा कर बुडविणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे, की त्यांच्या अवैध कनेक्शनची नोंद नसल्याने त्यांच्या पाणीकरांचा अतिरीक्त बोजा मात्र इतरांना कुठपर्यत सहन करावा लागेल, हे एक अनाकलनीय कोडचं बनले आहे.

काय म्हणतो सीईओंचा फतवा..
सीईओंनी 9 मार्च 2023 रोजी जा.क्र.080/नपंमो/सी.ओ/2022-23 काढलेल्या पत्रात प्रभारी सीईओ नळ सोडणाऱ्या व्हॉलमन नगर पंचायत मोताळा यांना दिलेल्या फतव्या म्हटले आहे, मोताळा नगर पंचायत पाणी पुरवठा विभाग अंतर्गत मोताळा शहरात पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवरील व्हॉल नगर पंचायत मालमत्ता कर व पाणी पट्टीकराची वसुली ही सन 2022-23 मध्ये, मार्चसमाप्ती कालावधी सुरु असून शहरातील कर वसुली फक्त 9 टक्के असल्याने ज्या प्रभाग/वाड मधील मालमत्ता कर व पाणी पट्टी कराची वसुली ही अतिशय कमी आहे. तश्या प्रभागातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवरील व्हॉल बंद ठेवणे बाबत सुचना देवून कर अधिक्षक न.पं.मोताळा व पाणी पुरवठा व मल्यनिस्सारण अभियंता न.पं.मोताळा यांचे निर्देशानुसार निर्देशीत भागातील व्हॉल बंद ठेवून पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु ज्या व्हॉलवर 50 नळ कनेक्शन आहेत, त्यापैकी 10 ते 15 नागरिकांनी पाणीकर व घरपट्टी कर भरला त्यांना सुध्दा पाणी पुरवठा होणार नाही, कारण कर न भरणाऱ्यांचे नळ कट करण्याचे आदेश कर्तव्यदक्ष सीईओंनी दिले नाहीत, ते केंव्हा देतील? व्हॉलवरील पाणी कर भरणाऱ्यांना पाणी पुरवठा कसा करतील? याचा दुसरा फतवा अतिकर्तव्यदक्ष प्रभारी सीईओ केव्हा काढतील, अशी मोताळा शहरावासीयांकडून मागणी होत आहे.

पाणी व घरपट्टी कर भरुन सहकार्य करावे..
मोताळा शहरात अनेकांकडे पाणीकर व घरपट्टीकर मोठ्या प्रमाणात थकला असून वसुलीची टक्केवारी केवळ 9 टक्केच आहे. नागरिकांनी आपल्याकडे असलेला कर भरुन नगर पंचायत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मोताळा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.