पिं.सराई येथे अनोळखी इसमाचे प्रेत आढळले

338

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (13 Mar.2023) तालुक्यातील सैलानी येथे संदल असल्याने १२ मार्च रोजी लाखो भाविकांची उपस्थिती होती. सैलानी बाबाच्या दर्शनासाठी आलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह आज सोमवार १३ मार्चच्या सकाळी आढळून आला. सदर मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन रायपूर पोस्टे.च्या वतीने करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव सराई येथील शंकर तळमळे यांच्या दुकानासमोर आज १३ मार्च रोजी सकाळच्या दरम्यान एका ६५ वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. पिं.सराई पोलीस पाटील रामेश्वर गवते यांनी घटनेची रायपूर पोस्टे.ला दिली. पोहेकाँ. प्रेमसिंग पवार यांनी घटनास्थळावर जावून पंचानामा केला. ओळख पटविण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे ठेवण्यात आला आहे. मृतकाचा रंग गव्हाळ असून डोक्यावर केस नाहीत, उंची अंदाजे ५.६ इंच असून पॅन्ट व त्यावर पट्टा लावलेला आहे. उपरोक्त फोटोतील वर्णनाच्या इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन रायपूर पोस्टे.च्या वतीने करण्यात आले आहे.