मोताळ्यात स्वामी समर्थ ऑटो स्पेअर पार्टचे दुकान फोडले; पावणेदोन लाखाचा माल लंपास !

930

‘ ब्रेक के बाद’ चोरटे झाले सक्रीय..

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(11 Apr.2023) मोताळा शहरामध्ये अनेक चोऱ्या झाल्यात, त्यापैकी कित्येक चोरट्यांचा मुसक्या आवळल्या गेल्या नसल्यामुळे ते अजूनही मोकाट फिरत आहेत. आता ‘ब्रेक के बाद’ मोताळा शहरात चोरटे सक्रीय झाले असून त्यांनी नांदुरा रोडवरील स्वामी समर्थ ऑटो स्पेअर पार्टचे दुकान फोडून टु व्हीलर इंजीन आईल, शॉकप आईल, सुटे स्पेअर पार्ट असा एकूण 1 लक्ष 67 हजार 500 रु.चा मुद्देमालावर डल्ला मारला आहे. भरवस्तीच्या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत रविंद्र राऊत यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा शहरात अनेक चोऱ्या झाल्या आहेत, यामुळे मोताळा शहरात पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्क पावर फुल्ल असल्याच्या चर्चांना अनेकवेळा उधाण आले, आणि त्या चर्चा नेहमी प्रमाणे नागरिक विसरुन सुध्दा गेलेत. आता मोताळा शरातील सर्वेश्वर नगर येथे राहणारे रविंद्र अरुण राऊत यांचे नांदुरा रोडवर स्वामी समर्थ ऑटो स्पेअर पार्टचे दुकान आहे. राऊत यांनी शनिवार 8 एप्रिल रोजी आपल्या कामे आटोपून दुकान बंद केले होते. रविवार 9 एप्रिल रोजी असोसिएशनचा बंद असल्यामुळे ते दुकान उघडू शकले नाही. सोमवार 10 एप्रिल रोजी त्यांनी दुकानासमोरील टाकी भरण्यासाठी दुकानामागील रुममधये असलेले बोरचे बटन चालू करण्यासाठी गेले असता त्यांना लोखंडी शटरचे कुलूप तुटलेले दिसले. यावेळी राऊत यांनी दुकानाची पाहणी केली असता त्यांना टु व्हीलर इंजीन आईल 100 लिटर किंमत 27 हजार 500 रुपये, टु व्हिलर शॉकप आईल 20 हजार रुपये, खुले स्पेअर पार्ट 1 लक्ष 20 हजार असा एकूण 1 लक्ष 67 हजार 500 रुपयांचा माल चोरुन नेल्याचे लक्षात आले. याबाबत राऊत यांनी बोराखेडी पोस्टे. फिर्याद दिल्याने 11 एप्रिल रात्री 12.22 मिनीटींनी एप्रिल बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द .अप.क्र.163/23 भादंवीचे कलम 461, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अशोक आडोकर हे करीत आहे.