अल्पवयीन मुलीचा विनयभंग व छेडखानी प्रकरण अंगलट; शुभम कांबळेला एका वर्षाचा सक्षम कारावास!

368

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (20.Apr.2023) 16 वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीचा पाठलाग करुन तीचा विनयभंग व छेडखानी केल्याप्रकरणी आरोपी शुभम प्रकाश कांबळे याला एक वर्ष सक्षम कारावास व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली असून दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधिश-2 बुलढाणा एस.बी.डिेगे यांनी आज 20 एप्रिल रोजी पारित केला आहे. सदर प्रकरणात जिल्हा सरकारी वकील तथा जिल्हा सरकारी अभियोक्ता वसंत एल.भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद केला.

चिखली येथील 16 वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीला आरोपी हा मागील 7 ते 8 दिवसापासून ती शाळेत व टयूशनला जात असतांना पाठलाग करुन तीला त्रास देत होता. परंतु भितीपोटी पिडीतेने सदर प्रकार तीच्या आईवडिलांना सांगितला नव्हता. परंतु आरोपीची हिमंत वाढल्याने त्यांने 28 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5.15 वाजता पिडीता शाळेतून परत येत होती. यावेळी आरोपी शुभम प्रकाश कांबळे रा. शेख अब्दुल नगर चिखली याने शाळेचे गेटसमोर मोटार सायकल घेवून त्याने पिडीता ही घरी येत असतांना मोटर सायकलने पाठलाग केला व जैन मंदीरापर्यंत येत पिडीतेला एकटीला पाहून गाडी आडवी उभी करुन ‘मला तुझ्या सोबत बोलायचे आहे, तू मला आवडतेस, तुझ्यासोबत मैत्री करावयाची आहे’ असे म्हटले. सदर घटना पिडीतेने आई-वडिलांच्या सांगितल्याने त्यांनी चिखली पोस्टे.ला आरोपी शुभम कांबळे याच्याविरुध्द फिर्याद दिली होती. त्यावरुन शुभमवर पोस्टे.ला भादंवीचे कलम 354, 354–डी व पोस्को अऑक्टचे कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानतंर आरोपविरुध्द सरकार पक्षाने एकूण 5 साक्षीदार तपासले, त्यापैकी पिडीता व तीचे वडिल यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल वसंत एल. भटकर यांनी जोरदार प्रभावी युक्तीवाद केला. सदर युक्तीवाद ग्राह्य धरीत एस.बी.डिेगे जिल्हा व सत्र न्यायाधीश -2 बुलढाणा यांनी आरोपी शुभम कांबळे याला भादंवीचे कलम 354 नुसार 1 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा साधा कारावास, 354–डी व पोस्को अँक्टचे कलम 12 मध्ये प्रत्येकी 3 महिने कारावास व प्रत्येकी 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची 7 हजार रुपयांची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पीएसआय.पांडुरंग शिंदे यांनी यांनी केला असून पोहेकॉ.सुनिल पवार यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले.