दुचाकी स्लीप झाल्याने 50 वर्षीय इसम जखमी

1137

बुलढाणा रोडवरील वाघजाळ फाट्याजवळील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (19Apr.2023) बुलढाणा-मलकापूर रोडवर परडा फाट्याजवळील वळणार एका 50 वर्षीय इसमाची दुचाकी स्लीप होवून अपघात झाला. सदर अपघात आज बुधवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास झाला. जखमी झालेल्या इसमाचे नाव निना प्रल्हाद सुरळकर असून ते अंत्री येथील असल्याचे समजते. त्यांना 11.35 वाजता 108 अ‍ॅम्बुलन्सने बुलढाणा येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अंत्री येथील निना सुरळकर हे आपल्या दुचाकी क्र.MH-28 BJ-3488 ने जात असतांना त्यांची गाडी बुलढाणा-मलकापूर रोडवरील परडा फाट्यावजळील वकानाजवळ स्लीप होवून खड्डयामध्ये पडल्याने त्यांना मार लागला, जवळपास अर्धातास त्यांना वाहन मिळाले नव्हते. 11.35 वाजता 108 अ‍ॅम्बुलन्स वाहनाने त्यांना बुलढाणा येथे उपचारार्थ हलविण्यात आले. त्यांच्या डोक्याला व तोंडाला मार लागल्याची माहिती समोर येत आहे.