मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले; स्मार्टफोन कारणीभूत ?

396
संहग्रीत फोटो सौजन्य इंटरनेटवरुन

111 दिवसात अमरावती विभागातील 842 मुली व महिला झाल्या बेपत्ता !

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (21.Apr.2023) आजच्या फाईव्ह जीच्या युगात 1 दिवस जेवण नसले तरी चालेल परंतु 30 मिनीटे स्मार्ट फोन जवळ नसला की मुला-मुलींचा जीव कासावीस होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सोशल मिडीयांच्या माध्यमातून अनेक मुलींची मुलासोबत मैत्री होवून त्या आपल्या मित्रासोबत फुर्र होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात 111 दिवसात 18 ते 30 वर्ष वयोगटातील 842 महिला व मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुलींचे बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणाला स्मार्टफोन कारणीभूत का? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.

सध्या विज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. ती क्रांती फायदेशीर तेवढीच तोट्याची ठरत आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयीन मुला-मुलींजवळ हजारो रुपयांचे महागडे फोन असल्याने मुली व मुले सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रथम मैत्री वाढून अल्पवयीन मुला-मुलींचे सुध्दा गर्ल व बॉयफ्रेंड असल्याने ते एकमेकांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चॅटींग करतात. तर महाविद्यालयीन मुला-मुलींचे शारिरीक आकर्षणातून संबंध सुध्दा प्रस्थापीत करण्याचे प्रकार वाढले आहे. काही तर सार्वजनिक ठिकाणी तो माझा बॉयफ्रेंड ती माझी गर्लफ्रेंड अशा चर्चा करतांना दिसत आहे. शारिरीक संबंध प्रस्थापीत झाल्यानंतर काही मुली आपल्या बॉयफ्रेंडला निर्लज्जपणे म्हणतात 10 दिवसवर झाले माझा पिरीयड आला नाही, आता पुढे काय करायचे? यामधून काही मुली आपले शोक पुरे करण्यासाठी मुलांना लुटण्याचे प्रकार सुध्दा करतात. तर काही मुले मुलींचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून नंतर लैंगीक शोषण केल्याचे प्रकार पोलिस स्टेशनपर्यंत सुध्दा पोहचले आहेत. पुढे बेपत्ता झालेल्या मुलींचे काय होते, याची माहिती मात्र समोर आलेली नाही.

बेपत्ता झालेल्या मुलींची जिल्हानिहाय आकडेवारी..

अमरावती विभागात जानेवारी ते 21 एप्रिल 2023 या 111 दिवसात 18 ते 30 वर्ष वयोगटातील एकूण 842 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधीक महिला अमरावती जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 56, फेब्रुवारी 63, मार्च 95, एप्रिल 62, अकोला जिल्ह्यात जानेवारी 18, फेब्रुवारी 30, मार्च 39, एप्रिल 16, बुलढाणा जिल्हा जानेवारी 45, फेब्रुवारी 45, मार्च 38, एप्रिल 35, वाशिम जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 8, फेब्रुवारी 18, मार्च 32 व एप्रिल महिन्यात 15, यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 59, फेब्रुवारी 51, मार्च 84 व एप्रिल महिन्यात 33 अश्याप्रकारे एकूण 842 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर यापैकी किती महिला व मुली घरी परत आल्या याची माहिती मात्र मिळू शकली नाही.