फर्दापूर वासीयांच्या उपोषणाची जिल्हा प्रशासनाकडून दखल; पोलिस संरक्षणामध्ये काढणार गावातील अतिक्रमण !

264

युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांनी सोडविले उपोषण

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (22.May.2023)मोताळा-गावातील विकास हा गावाच्या रस्त्यामुळे होतो, परंतु अनेकजण रस्त्यात अतिक्रमण करत असल्यामुळे रस्ता अरुंद होत असल्यामुळे गावामध्ये अ‍ॅम्बुलन्स, ट्रॅक्टर व मोठे वाहने येण्यास अडचणी निर्माण होत आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठीr मोताळा तालुक्यातील फर्दापूर येथील गणेश व्यवहारे यांच्यासह 20 ते 25 ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार २२ मे सकाळी ११ वाजता उपोषणास सुरुवात केली होती. यावेळी आ.संजय गायकवाड जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केल्याने जिल्हा प्रशासनाने पोलिस संरक्षणामध्ये अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिल्याने युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांच्याहस्ते उपोषण कर्त्यांना निंबु शरबत देवून उपोषणाची सांगता करण्यात आली.

मोताळा तालुक्यातील फर्दापूर गावातील येण्याजाण्याच्या मुख्य रस्त्यावर गावातील काही लोकांनी अतिक्रमण करुन रस्ता अरुंद केल्यामुळे गावामध्ये जड वाहने येण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. याबाबत समस्त ग्रामस्थांनी तहसिलदार व पंचायत समिती गटविकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या ढेपाळलेल्या अधिकाNयांनी कोणत्याही प्रकारची कारवाई की साधी चौकशी सुध्दा केली नाही. ग्रामस्थांच्यावतीने त्यांना ५ ऑगस्ट २०२२ रोजी परत एक स्मरणपत्र दिले होते. परंतु अधिकारी म्हणजे ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ असल्यामुळे १५ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामस्थ ढेपाळलेल्या प्रशासना विरोधात उपोषण सुरु केले होते, त्यावेळी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी उपोषणास भेट देवून फक्त भेट देवून तहसिल कार्यालय येथे १८ ऑगस्ट २०२२ रोजी बैठक घेतली. त्यावेळी ग्रामपंचायत सचिव, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व अर्जदार उपस्थित होते. रस्ता त्यामध्ये रस्ता नियमाप्रमाणे मोकळा करुन मिळेल व हे आश्वासन देण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले होते. परंतु आजपावेतो ढेपाळलेल्या प्रशासनाने न्याय दिला नाही.या रस्त्यामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतातील माल घरी आणण्यासाठी व गावातील आजारी रुग्णाला खांद्यावर उचलून गावाबाहेर आणावे लागते. फर्दापूर गावामध्ये येण्याजाण्यासाठी मुख्य रस्ता मोकळा करुन देण्यासाठी फर्दापूर येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आज सोमवार २२ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हात गणेश व्यवहारे यांच्यासह उपसरपंच निवृत्ती श्रीकृष्ण व्यवहारे,सोपान व्यवहारे, बाळाभाऊ व्यवहारे, मोहन व्यवहारे, शिवदास व्यवहारे, माणीकराव भगत, मुकुंदराव व्यवहारे, विनायक पाटील, सुनिल व्यवहारे, वैभव व्यवहारे, मोहन व्यवहारे, मोहन शालीग्राम व्यवहारे, कैलास व्यवहारे यांच्या २० ते २५ ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले होते. सदर अतिक्रमण पोलिस संरक्षणात काढण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्याने युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना निंबु शरबत देवून उपोषणाची सांगता केली. यावेळी उपोषणकर्त्यांनी आ.संजय गायकवाड व युवानेते मृत्यूंजय गायकवाड यांचे आभार व्यक्त केले.