बुलढाणा राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; महिन्याभरात 100 गुन्हे नोंदवून दहा लाखाचा मुद्देमाल केला जप्त !

502

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (29.May.2023)राज्य उत्पादन शुल्क विभागाने मे महिन्यात अवैध दारू विरोधात 100 गुन्ह्याची नोंद केली आहे.. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हातभट्टी दारूविरूद्ध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीचे 100 गुन्हे नोंदविले आहे. यामध्ये 102 आरोपींसह 4 वाहने असा एकूण 1 हजार 226 लिटर हातभट्टी दारू, 38 हजार 302 लिटर मोहा रसायन, 196.92 लिटर देशी दारू आणि 46.44 लिटर विदेशी दारूसह 9 लाख 71 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धडक कारवाई केली आहे.

बुलडाणा शहरातील कैकाडी पुरा, भिलवाडा, परदेशीपुरा व बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नाईक, डोंगर खंडाळा, भादोला, येळगांव, मढ, बोराखेडी, लासुरा, नरवेल, तसेच चिखली कार्यक्षेत्रातील गवळीपुरा चिखली, गवळीपुरा लोणार, चायगाव, खामगाव कार्यक्षेत्रातील देऊळगाव साकर्शा, वाडी शिवार मेहकर, शिराळा, मानेगाव फाटा, आरेगाव कळंम्बेश्वर या परिसरामध्ये मोहिमेंतर्गत अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दारु शासनमान्य मद्यविक्री दुकानातूनच खरेदी करा..

बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी किंवा गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे.

अवैध दारु विक्रेत्यांनी खालील नंबरवर तक्रार नोंदवा !

आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री किंवा बनावट मद्यनिर्मिती होत आढळल्यास टोल फ्री नंबर 18002339999 किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर 8422001133, किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी. जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

तरीही ढाब्यावर अवैध दारु विक्री जोमात..!

आजरोजी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ढाब्यावर पोलिस बिट जमादार हप्ते घेवून काम फत्ते करीत असून 1500 ते 2000 हजार रुपये महिन्याकाठी वसुली करीत आहे. ग्रामीण भागात गाव येथे दोन ते तीन देशी दारु विक्री करणारे दुकाने आहेत. याबाबत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिलांनी व ग्रामस्थांनी दारु विक्रेत्यांना समज दिली असता, ते उलट म्हणतात बिट जमादार येतो, हप्ते घेवून जातो, हप्ते देतो म्हणून दारु विकतो. ढाब्यावरील व ग्रामीण भागातील अवैध देशी, गावठी दारु विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी महिलावर्गाकडून होत आहे.