बेलाडच्या नवरदेवाचा नांदचं खुळा; डीजे.ला टाळून टाळ-मृदुंगाच्या गजरात काढली वरात मिरवणूक !

1839

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (29.May.2023) विवाह म्हटलं की एकदाच होतो, लग्नामध्ये डीजे.ला प्रथम पसंदी दिली जाते. डीजेच्या तालावर नाचतांना लग्न वेळेवर तर लागतच नाही. यामुळे लग्न लावण्यासाठी येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, 12 वाजेचे लग्न 3 वाजता लागल्याने अनेकजण अहेर करुन उपाशी पोटीच परततात. ही पध्दत बेलाड ता.मलकापूर येथील नवरदेव गणेश जगन्नाथ संबारे यांनी मोडीत काढीत आज सोमवार 29 मे रोजी आव्हा ता.मोताळा येथे डीजे किंवा बॅण्डचा उपयोग न करता वारकरी साप्रंदायाचा वारसा जपत टाळ-मृदुंगाच्या गजरात शिवकिर्तन व फुगडीचा आनंद घेत ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत नवरदेवाची वरात मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण केला आहे.

लग्न सराईच्या काळात जिकडे-तिकडे सर्वीकडे डीजे. बॅण्डची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. हजारो-लाखोच्या डीजे.मुळे अनेकांना त्रास होतो. लग्नात डीजे.च्या तालावर रखरखत्या उन्हात थिरकल्यापेक्षा हिंदु धर्मानुसार गृहस्था आश्रमाची सुरुवात टाळ-मृदुंगाच्या निनादात करण्याचे ठरविल्याने मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील जगन्नाथ केशव संबारे यांचे सुपूत्र चि. गणेश जगन्नाथ संबारे व आव्हा येथील ओंकार मधुकर घोंगटे यांची सुकन्या चि.सौ.का. निकिता ओंकार घोंगटे यांचा विवाह सोहळा आव्हा येथे पार पडला आहे.

या विवाह सोहळ्यात नवरदेव चि.गणेश यांची मिरवणूक टाळ मृदंगाच्या तालात वरात काढण्यात आली. संपूर्ण गावातून वरात फिरुन आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पुजन वधु-वरांच्या हस्ते करुन हारार्पण करण्यात आले. त्यानंतर हभप.महाराजांच्या उपस्थित लग्न सोहळा पार पडला. टाळ, मृदुंगाच्या गजरात काढलेल्या वरातीचा आदर्श इतर गावकऱ्यांनी घेतल्यास लग्न वेळेवर लागून पाहुणे मंडळीना सुध्दा त्रास न होता, ते लग्नाचे जेवण करुन पुढे मार्गस्थ होतील, एवढे मात्र निश्चीत !

नवरदेवाचे होत आहे सर्वत्र कौतूक..

सध्याच्या सोशल मिडीयाच्या 4 जीच्या जमान्यातील मुलांना स्वतः च्या लग्नाची आगळी वेगळी आशा असतांना कुठलाही व्यर्थ खर्च न करता वारकरी सांप्रदायाचे विचार जोपासत आव्हा येथे प्रत्यक्षात टाळ मृदंगाच्या गजरात चि.गणेश संबारे यांनी वरात काढल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

खोट्या प्रतिष्ठेचा अट्टाहास कशासाठी?

आजच्या काळात परिस्थिती नसून खोट्या प्रतिष्ठेमुळे अनेकजण कर्ज काढून व्यर्थ खर्च करतात. हा होणारा अनावश्यक खर्च टाळून संबारे व घोंगटे परिवाराकडून चालवलेल्या या आगळ्यावेगळ्या चळवळीचा आदर्श घेवून असे लग्न झाल्यास लग्नात होणारा अनावश्यक खर्च वाचून धार्मिक प्रवृत्तीचे वातावरण निर्माण होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही !  -शुभम घोंगटे, युवासेना (उबाठा)उप जिल्हा प्रमुख