घुस्सर बु.येथे 2 जूनला सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी प्रबोधन किर्तनाचा कार्यक्रम !

364

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28.May.2023) वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष निलेश जाधव यांच्या मातोश्री स्व.मंगलाबाई शांताराम जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने मोताळा तालुक्यातील घुस्सर बु.येथे सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी जाहीर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्व.मंगलाबाई शांताराम जाधव यांच्या प्रथम पुण्स्मरणीदिनी शुक्रवार 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पाण्याच्या टाकीजवळ किक्रेट मैदान घुस्सर बु.येथे सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात समाजासाठी विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या रणरागीनींना प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन वऱ्हाडी कवी गोपाल तुळशीराम मापारी हे करणार आहेत. या प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जाधव परिवार व समस्त गावकरी घुस्सर, बु.,खु.यांच्यावतीने करण्यात आले आहे.