विजयराज शिंदेंच्या पाठपुराव्याने; पान्हेरा येथील सतिमाता मंदीरासाठी 1 कोटींचा निधी मंजूर !

334

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (8.JUNE.2023) बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये तीनवेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांचा जनसंपर्क व जलवा कायम असून त्यांच्या चाहत्यांची घाटाखाली मोठी फळी आहे. बेलदार समाजासह असंख्य भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या मोताळा तालुक्यातील पान्हेरा गावात असलेल्या श्रीक्षेत्र सतीमाता संस्थानच्या विविध विकास कामांसाठी भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या मागणी व पाठपुराव्याने पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांनी सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षासाठी 1 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचे शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मोताळा तालुक्यातील पान्हेरा येथील श्रीक्षेत्र सतिमाता संस्थान हे अखिल भारतातील बेलदार समाजाचे मोठे श्रध्दास्थान आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक भक्त येत असतात. फक्त बेलदार समाजच नव्हे तर इतर समाजातील भाविक भक्त सतीमातेला मानीत मनोभावे येऊन पूजाअर्चा करत असतात. विजयराज शिंदे यांनी आमदार असतांनाच्या कार्यकाळात श्रीक्षेत्र सतिमाता संस्थान ला ‘क’ तिर्थ क्षेत्राचा दर्जा व इतर अनेक योजनांच्या माध्यमातून सभामंडप, सभागृह,पाण्याची टाकी, भक्त निवास यांसह अनेक विकास कामे करून तिर्थक्षेत्राचा विकास केलेला आहे. या तिर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांची दिवसेंदिवस येणारी संख्या लक्षात घेऊन अनेक विकास कामे करणे गरजेचे आहे ही मागणी संस्थान चे अध्यक्ष व विश्वस्थानी विजयराज शिंदे यांच्याकडे केली होती. याबाबत

सतिमाता संस्थानचे स्वरुप पालटणार !

विजयराज शिंदे यांनी पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांना 28 मार्च 2023 रोजी लेखी पत्र देऊन संस्थानच्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ना. मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या खात्याच्या पर्यटन विकास योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचा भरघोस निधी 1 जून 2023 मंजूर केला असून तसा शासन निर्णय काढून जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तात्काळ 30 लाख रुपये खर्चाची मान्यता सुद्धा प्रदान केली आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र सतिमाता संस्थान तिर्थक्षेत्राचे स्वरूप लवकरच पालटणार असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी विविध विकास कामे होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.