सैलानी परिसरात अवैधरित्या दारू विकणारा प्रदीप निकाळजे 2 महिन्यासाठी तडीपार !

586

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (9.JUNE.2023) सैलानी परिसरात प्रदीप निकाळजे या अवैधरित्या दारु विक्रीचा धंदा करीत होता. त्याच्यावर रायपूर पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी प्रदिप मनोहर निकाळजे रा. सिंदखेड, ह.मु.सैलानी यास बुलडाणा जिल्ह्यातून दोन महिन्याच्या कालावधी करीता तडीपार करण्यात आले असून त्याला आज 9 जून रोजी जालना जिल्ह्याच्या हद्दीत सोडून देण्यात आले.

प्रदीप निकाळजे हा सैलानी परिसरात अवैधरित्या दारु विक्री करीत असल्याने त्याच्यावर वेळोवेळी रायपूर पोलिसांनी कारवाया सुध्दा केल्या होत्या. परंतु त्याच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवाया थांबत नसल्याने रायपूर पोलिस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता ठाणेदार राजवंत आठवले यांनी प्रदीप निकाळजे विरुध्द तडीपार प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक बुलढाणा यांचेकडे सादर केला होता. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी नियोजित तडीपार प्रदिप मनोहर निकाळजे, (वय 36) रा. सिंदखेड ह.मु.सैलानी ता.बुलडाणा यांचे विरुध्द कलम 56 ( 1 ), (अ), (ब) मुंबई पोलीस कायदा 1951 अन्वये तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांना पाठविला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा यांच्या सखोल चौकशी अहवालाचे आधारे उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी प्रदिप मनोहर निकाळजे याला बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिने तडीपार केल्याचे आदेशानुसार प्रदीप निकाळजे याला तडीपार करुन जाफ्राबाद पोस्टे. जि.जालना हद्दीत आज शुक्रवार 9 जून रोजी सोडून देण्यात आले आहे, या दरम्यान निकाळजे याला स्थानिक पोलीस स्टेशन जाफ्राबाद येथे दर पंधरा दिवसाला एक दिवस हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

निकाळजे दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

तडीपारीची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली रायपूर पोस्टे.ठाणेदार राजवंत आठवले, पो ना.ऋषिकेश पालवे, पोशी राजू गव्हाणे यांनी केली आहे. सदर तडीपार इसम रायपूर परिसरात दिसल्यास रायपूर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार राजवंत आठवले यांनी केले आहे.