नळावरुन पाणी आणते, असे सांगून टाकरखेड येथील 19 वर्षीय युवती झाली बेपत्ता!

52

27 दिवसात जिल्ह्यातील 51 मुली झाल्या बेपत्ता !

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (27.JUNE.2023) नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील 19 वर्षीय युवती 26 जून रोजी नळावरुन पाणी आणते, असे सांगून सायंकाळी 7.30 वाजता घरुन निघून गेली आहे. सदर युवतीचे नाव भारती दिनकर घुले असे आहे. याबाबत बोराखेडी पोस्टे.ला आज 27 जून रोजी मिसींग दाखल करण्यात आली आहे.

नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील 19 वर्षीय भारती घुले ही युवती 26 जूनच्या सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास टाकरखेड येथून नळावरुन पाणी भरुन आणते, असे सांगून स्व:ताचे आधार कार्ड घेवून घरुन निघून गेली , अशा दिनकर घुले यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला आज 27 जून रोजी मिसींग दाखल करण्यात आली आहे. सदर युवतीने पांढरे रंगाचा पंजाबी ड्रेस, लाल रंगाची लॅगी, पांढरे रंगाची आढणी, पायामध्ये पांढरे पट्टे असलेली चप्पल, उजवे खांद्यावर जुन्या जखमेचे वण असे वर्णन आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.

  • जिल्ह्यामध्ये महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जून महिन्यात 27 दिवसात 51 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा अधिकृत मिसिंग रिपोर्ट आहे, परंतु काहींनी घरातील इभ्रत वेशीवर येवू नये म्हणून मिसींग दाखल केली नाही, तो आकडा सुध्दा मोठा असू शकतो, हे विशेष!