Wednesday, May 20, 2026
Home Buldana मोताळ्याचा आठवडी बाजार शुक्रवारी भरणार !

मोताळ्याचा आठवडी बाजार शुक्रवारी भरणार !

122

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (27.JUNE.2023) मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असून त्याला लागून 50 ते 60 खेडे आहेत. येथे गुरुवारी मोठा आठवडी बाजार व ढोरबाजार भरतो. परंतु यावेळी गुरुवार 29 जून रोजी आठवडी बाजार आला असल्याने त्या दिवशी आषाढी एकादशी व बकरी ईद असल्याने गुरुवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असून तो शुक्रवार 30 जून भरणार आहे, याची व्यावसायीक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मोताळा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मोताळा येथे दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारामध्ये, 50 ते 60 गावातील हजारोच्या संख्येने नागरिक बाजारासाठी येतात. तसेच नांदुरा, मलकापूर, बुलढाणा शहरातील व्यावसायीक आपले दुकाने थाटतात. गुरुवार 29 जून रोजी आठवडी बाजार आला असून त्याच दिवशी हिंदू बांधवांची आषाढी एकादशी व मुस्लीम बांधवांची बकरी ईद असल्याने गुरुवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असून तो शुक्रवार 30 जून रोजी भरणार आहे, याची नागरिक व आठवडी बाजारात दुकाने थाटणाऱ्या व्यावसायीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मोताळा नगर पंचायत प्रभारी मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

Don`t copy text!