चिखलीत गुंडगिरी फोफावली; सतिष गुप्त यांच्या चालकाला चौघांनी केली रॉडने बेदम मारहाण!

84

चिखली- (17 NOV.2017) जिल्ह्यात दिवसेंनदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी समोर येत आहे. चिखली येथे काही गुंडानी ‘आव तेथे काव’ आणीत सतिष गुप्त यांच्या चिखली अर्बन बँकेत काम करणाऱ्या चालकाला चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन त्यांच्या जवळून 15 हजाराचा मोबाईल व 5 हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना 15 नोव्हेंबरच्या रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडल्याने चिखलीत पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याची चर्चा सुरु आहेत. याप्रकरणी चिखली पोस्टे.ला अज्ञात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश देविदास कुटे रा.संभाजी नगर यांनी चिखली पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ते चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिष गुप्त यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 वाजेच्या दरम्यान सतिष गुप्त यांना दुचाकीवरुन त्यांच्या जाफ्राबाद रोडव्रील ‘रानवारा’ येथे सोडून देवून परत येत असतांना बाबा पेट्रोलपंपा जवळील कमानीजवळ उभे असलेल्या दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी कुटे यांच्या डाव्या हातावर व डोक्यावर रॉड मारुन त्यांना खाली पाडले. परत दोघांनी पाठीमागून येवून त्यांना रॉड मारुन जखमी केले. जीव वाचविण्यासाठी ते बाजुच्या शेतामधून पळून जात असतांना चार इसमांनी माझा पाठलाग करुन पकडून रॉडने डाव्यापायाच्या पोटरीजवळ मारहाण केल्याने जखमी झाल्याने ओरडत असतांना सदर अज्ञात इसमांनी खिशातील 15 हजार रु.चा मोबाईल व पॉकीटामधील 5 हजार रुपये असा एकूण 20 हजार रुपयांचा माल जबरीने हिसकावून नेल्याच्या फिर्यादीवरुन चिखली पोलिसांनी चार अज्ञात इसमांवर भादंवीचे कलम 34, 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालक धावले मदतीला

जखमी अवस्थेत गणेश कुटे यांनी सदर घटना आपले मालक सतिष गुप्त यांच्या घरी जावून सांगितली. डॉ.अशुतोष गुप्त यांनी कुटे यांना जखमी अवस्थेत खाजगी वाहनाने विष्णु खेडेकर यांच्या हॉस्पीटल चिखली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. गणेश कुटे यांच्यावर चार अज्ञातांनी मारहाण कोणत्या कारणासाठी व का केली? हे मात्र समजू शकले नाही. चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.