जळकुट्याने आता कळसच गाठला; ज्येष्ठ नागरिकाची लुनाच जाळली !

61

चिखली- (17 Nov.2023) काही जळकटे लोक दुश्मनी काढण्यासाठी कोणत्याही स्थराला जावू शकतात. मग तो जळकुट्या कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता दुश्मीनीसाठी सज्ज होतो. अशीच घटना चिखली तालुक्यातील गोदरी गावात घडली. तेथे एका अज्ञाताने एका ज्येष्ठ नागरिकाची लुनाच जाळल्याचा प्रकार उघडकीस आली.

निवृत्ती कऱ्हाडे गोदरी यांनी चिखली पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांच्या टीव्हीएस कंपनीची लुना क्र. एम.एच-28 बीआर-3306 आहे. त्यांनी 11 नोव्हेंबर रोजी लुना आपल्या दारासमोर लावलेली होती. रात्री 2.30 वाजेच्या दरम्यान सौ.गुंफाबाई बकाल लघुशंकेसाठी उठल्या असता त्यांना फिर्यादीच्या घराजवळ जाळ दिसला. त्यांनी येवून पाहिले असता घरासमोर उभी केलेली लुना जळालेली दिसल्याने त्यांना फिर्यादीला उठवून सदर घटना सांगितली. सदर लुना जळालेल्या अवस्थेत दिसल्याने ज्ञानदेव सुरकडर, पुरुषोत्तम मोळवंडे, शुभम बाहेकर यांनी पाणी टाकून विझविली. लुना अज्ञाताने जाळल्याने त्यांचे 50 हजाराचे नुकसान झाल्याच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमावार भादंवीचे कलम 435 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.